हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१९,हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हत्ता(नाईक) येथील धक्कादायक घटना
सेनगांव तालूक्यातील हत्ता (नाईक)येथील देवानंद जनार्धन चक्के वय १८ हा तरूण गुरूवार रोजी दूपारी १२:३० वाजता सूमारास वडिलांचा जेवणाचा डबा घेऊन शेतामध्ये जात असतांना वाटेतच विजेचा शॉक लागून दूर्देवी मूत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली
वडील शेतात पिकाला पाणी देत आहेत म्हणून मूलगा
देवानंद चेके हे दूपारी जेवणाचा डबा घेऊन जात होते पण मात्र वातेटच डिपी मधून विज प्रवाह असलेला टूतून पडलेल्या तारेला पायाचा स्पर्श झाला आणी देवानंद चेके यांचा जाग्यावरच मूत्यू झाला देवानंद चेके हा १२ वी शिक्षण शिकत होता अचानकच दूर्देवी मूत्यू मूळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
विज वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांच्या मूलाला नाहक जिवास मूकावे लागले
ग्रामस्थांकडून विज वितरण कंपनीचा भोंगळ कारभारावर रोष व्यक्त केला जात आहे

