shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यटकांसाठी शनिवारवाडा खुला करा अन्यथा दोन दिवसानंतर आम्ही उघडू, ब्राह्मण महासंघाचा पुरातत्व खात्याला इशारा..!!


पुणे:-राज्यात अनलॉक सुरू असताना बंद असलेल्या सर्व गोष्टींना हळूहळू परवानगी देण्यात येत आहे. राज्यातील धार्मिक स्थळांना आणि ऐतिहासिक स्थळांनाही सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे परंतु असे असताना पुण्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेला शनिवारवाडा मात्र अजूनही बंदच आहे. त्यामुळे बंद असलेला हा शनिवारवाडा तातडीने सुरु करावा अशी मागणी ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
पुरातत्व खात्याने दोन दिवसात शनिवार वाडा पर्यटकांसाठी न उघडल्यास ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी स्वतःहून शनिवारवाडा उघडतील, असा इशारा त्यांनी दिलाय.

दवे म्हणाले लॉकडाउनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व धार्मिक स्थळ आणि ऐतिहासिक स्थळे उघडण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली. महाराष्ट्र सरकारनेही ऐतिहासिक स्थळ उघडण्यासाठी परवानगी दिली. परंतु पुरातत्व खात्याला मात्र अजूनही जाग आलेली दिसत नाही. त्यामुळेच की काय पुण्यातील शनिवारवाडा अजूनही बंद अवस्थेत आहे.

दिवाळीनिमित्त किंवा इतर काही कारणासाठी बाहेरगावचे लोक पुण्यात आल्यानंतर त्यांना शनिवारवाडा पाहण्याची इच्छा असते. परंतु तो बंद असल्यामुळे त्यांना पाहता येत नाही. हा पुणेकरांचा अपमान आहे असं आम्ही मानतो. त्यामुळे हा शनिवारवाडा ताबडतोब पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात आम्ही पुरातत्व खात्याला निवेदन देणार आहोत. त्यानंतर पुढच्या दोन दिवसात पुरातत्व खात्याने शनिवारवाडा उघडला नाही तर आम्ही स्वतः पुढाकार घेऊन पर्यटकांसाठी शनिवारवाडा खुला करू, असा इशारा आनंद त्यांनी यावेळी दिला.
close