shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमोल राजे इंगळे यांच्या कोरोणा काळातील कार्याची दखल घेऊन आमदार राहुल कुल व भाजपा महिला पुणे जिल्हा अध्यक्षा कांचन ताई कुल यांच्यावतीने दिले सन्मानपत्र...!!

इंदापूर । प्रतिनिधी :
इंदापूर: दि.९/११/२०२०. राहू तालुका दौंड येथे (दि.८) रोजी भाजप युवा नेते बाभूळगाव चे सुपुत्र  अमोलराजे इंगळे यांना दौंडचे आमदार  राहुल  कुल दौंड विधानसभा मतदारसंघ यांनी राहु येथे आपल्या निवासस्थानी अमोलराजे इंगळे यांच्या कार्याची दखल घेऊन इंदापुरात केलेल्या  कोरोना काळातील कामाबद्दल सन्मानपत्र देऊन शुभेच्छा दिल्या सदर पत्र भाजपा महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सौ कांचना ताई कुल यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी त्यांच्या समवेत हर्षल भटेवरा उपाध्यक्ष भारतीय जैन संघटना पुणे जिल्हा माऊली ताकवणे अध्यक्ष भाजप दौंड तालुका मयूर सोळस्‍कर, सचिव मराठा महासंघ पुणे जिल्हा ,सचिन गुंड अध्यक्ष दौंड तालुका पोलीस फ्रेंड्स असोसिएशन, युवा नेते मंगेश भोसेकर, पत्रकार राहुल बिचकुले, रामभाऊ जामदाडे ,नारायण आसबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी कांचनताई कुल यांनी इंदापूर तालुक्यातून आलेल्या या कार्यकर्ते यांचा पाहुणचार स्वतः  केला आणि एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जो वेळ देऊन सन्मान सोहळा साजरा केला हे विशेष कौतुकचे कार्य आहे .सौ. कांचनताई कुल म्हणाल्या की आपली माणसं आपली कार्यकर्ते आपणच वेळ देऊन सांभाळायची असतात जे आपल्याकडे आलेले आहेत त्यांना वेळ देऊन त्यांचा सन्मान करणे हीच खरी माणुसकी असते हे कार्य त्यांनी आज आपल्या कार्यातून दाखवूनही दिले.

अमोलराजे इंगळे यांना यावेळी  झाड भेट देण्यात आले .त्यावेळी त्यांनी आमदार राहुल कुल  व कांचनताई कुल यांचे विशेष पाहुणचार व सन्मान दिला  आपुलकीचं नातं दाखवल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.
close