shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत बॅलेट पेपर असल्याने आमचा विजय निश्चित .. ॲड. राहुल मखरे..!!

बहुजन मुक्ती पार्टी पुरस्कृत उमेदवार रवींद्र चंदर सोलनकर यांच्या प्रचारार्थ आज  पत्रकार परिषद स्वामीराज हॉटेल येथे संपन्न..!!


इंदापूर प्रतिनिधी
इंदापूर: २१ नोव्हेंबर २०२० रोजी इंदापूर येथील स्वामीराज हॉटेल येथे बहुजन मुक्ती पार्टी यांच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियनची प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुजन मुक्ती पार्टी पुरस्कृत उमेदवार रवींद्र चंदर सोलनकर यांच्या प्रचारार्थ आज बैठक आयोजित केली होती.
 

यावेळी या बैठकीस बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ बारवकर, बहुजन मुक्ती पार्टीचे इंदापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग .तसेच भारतीय युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरज धाईंजे उपस्थित होते.

यावेळी बहुजन मुक्ती पार्टी चे ॲड. राहुल मखरे म्हणाले की , ही निवडणूक ईव्हीएम मशीन वर नसून बॅलेट पेपर वर आहे .याच्यामुळे वास्तविक परिस्थिती व पक्षाची ताकद दिसून येणार आहे. शिक्षक मतदार संघ व पदवीधर मतदार संघ हे सुशिक्षित मतदार असल्याने या मतदान प्रक्रियेत चिन्ह नाहीत. तर पसंती क्रमांक आहेत. यापुढे बोलताना मखरे म्हणाले २००४ पासून पेन्शन कायदा रद्द करण्यात आला २००५ नंतर कामाला लागणाऱ्या कोणत्याही ही कर्मचारी यांना पेन्शन योजना लागू होणार नाही. २००९ साली आर. टी. इ .कायदा आणला .शिक्षक संघटनेच्या वतीने कुडाळ आणि महाबळेश्वर या ठिकाणी अधिवेशन करून हा कायदा लागू करण्याची मागणी केली .आर.टी.ई. म्हणजे शिक्षणाचा मूलभूत अधिकार परंतु या कायद्यामध्ये ७५ टक्के लोकांना शिक्षण पैसे भरुन आणि २५ टक्के लोकांना मोफत शिक्षण करून जाहिरात केली.  मुलांच्या मेंदूचा विकास होण्याचे वय ० ते ६ वर्ष असते. परीक्षा ही मेंदूचा विकास होण्यासाठी घेतली जाते. कोळशाच्या खाणीत हिरा मिळतो परंतु तो हिरा मिळवताना पैलूची गरज असते.२००९  पासून आज पर्यंत एकही शिक्षक भरती शासकीय सेवेत नाही. ही गेल्या अकरा वर्षांत एकाही शिक्षकांची भरती महाराष्ट्र सरकारने  केली नाही. डीएड, बीएड च्या कोर्ससाठी विद्यार्थी यांचा कल बंद होऊन डीएड बीएड कॉलेज बंद पडले .डीएड, बीएड शिक्षकच तयार झाले नाहीत, तर भविष्यात मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध होणार नाहीत. माणसात शिक्षणामुळे प्रगती होते मानसन्मान मिळतो. किंमत येते. बुद्धीचा विकास शिक्षणामुळे होतो. 

विवेकबुद्धी जागृत होते. स्वाभिमान तयार होतो. खरे काय आणि खोटे काय हे समजते .अशिक्षित लोकांचा कसेही वापर करता येते. भविष्यात शिक्षणाच्या सध्याच्या धोरणामुळे आपल्या मुलांना  कल्पना न करण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. २५% मोफत आणि ७५ टक्के विकत म्हणजे शिक्षण विकत घेण्यासारखे आहे. या परिस्थितीमध्ये आम्हाला आमचा उमेदवार देणे भाग पडले . याबद्दल आवाज करायचा असेल तर या विचारावर आवाज उठवणारा हा प्रतिनिधी विधान परिषदेमध्ये असणे गरजेचे आहे.  


आवाज उठवेल व मीडिया मध्ये येईल आणि मीडिया मध्ये आल्यानंतर त्या गोष्टीवर चर्चा समाजात पसरेल व समाजाचे सरकारवर एक मत बनते या परिस्थिती वर आम्ही उमेदवार उभा केला आहे .राष्ट्रीय ट्रेड  आणि बहुजन मुक्ती पार्टी मुळे हा उमेदवार स्पर्धेत आहे .या निवडणुकीत बॅलेट पेपर असल्याने आमचा   विजय निश्चित आहे .इंदापूर तालुक्यातील सर्व शिक्षकांना जाहीरनामा देऊन प्रचार करणार. असे यावेळी ॲड. राहुल मखरे यांनी आपले मत व्यक्त केले .
close