shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानात वडार मजुर शिल्प दाम्पत्य लख्ख दिव्यांनी झाले प्रकाशमान..!!

वडार इतिहास जागा झाला असे रमणीय आणि प्रेक्षणीय स्थळ..!!

हे क्षणचित्रे टिपले विठ्ठल मोरे,जेष्ठ समाजसेवक,पिंपरी चिंचवड यांनी..!!
 
पिंपरी- चिंचवड : बर्ड व्हॅली उद्यानात वडार मजुर दांपत्य शिल्प साकारलेले आहे. दरवर्षी १ मे रोजी या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वडार मंजूर दांम्पत्य शिल्प पहाण्यासाठी बर्ड व्हॅली उद्यानात हजारो पर्यटक हजेरी लावून आनंद घेतात. येथील वैशिष्ट्यपूर्ण असलेले हे शिल्प पर्यटकांना विशेष आकर्षित करते.  

यावर्षी दिवाळी-पाडवा निमित्त या ठिकाणी येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक पणत्यांचे दिवे लावून येथील वातावरण मनमोहक व नयनरम्य दिव्यांनी उजळून टाकले होते. यावेळी येथील वातावरण लख्ख दिव्यांनी प्रकाशमान झाल्याचे भासत होते.

या वेळी प्रमुख पाहुणे श्री. कदम साहेब यांनी हजेरी लावली. तर अनिल विटकर, अध्यक्ष, वडार मजूर  शिल्प प्रतिष्ठान; शामराव विटकर, संस्थापक:- वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान, मा.अघ्यक्ष अनंत नलावडे,.सामाजिक कार्यकर्ते संदिपदादा  शिंदे, समाजसेवक नागेश पवार, लखन पाटकर, अमर दौंडकर आदी सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या नयनरम्य झगमगाटाचा आस्वाद घेतला. 

या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या वडार मंजूर दांम्पत्य शिल्प पहाण्यासाठी बर्ड व्हॅली उद्यानात हजारो पर्यटक हजेरी लावून आनंद घेतात.  
यावर्षी दिवाळी-पाडवा निमित्त या ठिकाणी येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक पणत्यांचे दिवे लावून तेथील वातावरण मनमोहक व नयनरम्य दिव्यांनी उजळून टाकले होते.
close