सोनई । प्रतिनिधी (मोहन शेगर ):
सोनई येथे शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीत बोलताना पोलीस निरीक्षक कर्पे साहेब यांनी सांगितले कि कोरोनाच्या काळात आपली व आपल्या कुटूंबाची काळजी कशी घ्यावयाची...; सोशल मीडियाच्या अफवावर विश्वास ठेऊ नये; जेणेकरून या सोशल मीडियाच्या माध्यमातून जाती जातीमध्ये तेढ निर्माण होऊ शकतो.
अशा अफवावर विश्वास ठेऊ नये. सोशल मीडिया, व्हाट्सअप,ट्विटर यावर आलेल्या व्हिडीओ मेसेज फोटो यांची शहानिशा करूनच फॉरवर्ड करावे. अशा अफवा पसरविणाऱ्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल. असे आवाहन पोलीस यंञणेमार्फत करण्यात आले. समाजा- समाजामध्ये सलोखा कसा राहील या साठी गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला मदत करावी.
या बैठकिला सोनईचे सरपंच दादासाहेब वैरागर, उपसरपंच संदीप कुसळकर, पत्रकार मोहन शेगर, सामाजिक कार्यकर्ते नजीर भाई सय्यद, गुलाब पालवे,खालीलभाई इनामदार, कलीम पठाण, आदी लोक उपस्थित होते,

