shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

..तर प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क मिळवून देऊ- ॲड.पुरूषोत्तम खेडेकर..!!

.
सोलापूर । प्रतिनिधी :
पुणे पदवीधर मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडचा उमेदवार विधानपरिषदेत गेला तर तो शिक्षक आमदारकीच्या निवडणूकीसाठी प्राथमिक शिक्षकांना मतदार म्हणून हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन त्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागली तरी करू कारण राज्यात त्यांची संख्या जास्त आहे व समस्याही इतरांपेक्षा जास्त आहेत.त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. शासकीय नोकऱ्यांबरोबरच रोजगार निर्मिती कडे तरूणांना वळविण्यासाठी विविध आर्थिक योजना प्राधान्याने सुरू करण्यात येतील असे ॲड पुरूषोत्तम खेडेकर यांनी सांगितले. 
               ॲड. पुरूषोत्तम खेडेकर

ते सोलापूरात संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार इंजिनिअर मनोजकुमार गायकवाड यांच्या प्रचारार्थ विजापूर रस्त्यावरील मयुर मल्टपर्पज हॉलमध्ये आयोजित पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. पेन्शन या विषयी बोलताना २००५ नंतरील नियुक्त प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी आपण निवडून आल्यास सभागृहात संसदीय आयुधांचा वापर करून सरकारला जेरीस आणुन पेन्शन देण्यासाठी भाग पाडू असे संभाजी ब्रिगेडचे उमेदवार इंजि.मनोज गायकवाड यांनी  सांगितले.
close