लोहा। प्रतिनिधी :
आज किवळा ता. लोहा येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी किवळा येथील प्रसिद्ध शाह हुसेन मस्तान दर्गाला भेट दिली.
याप्रसंगी सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने आशाताईंचा छोटेखानी कार्यक्रमात यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी आशाताई यांनी शाह हुसेन मस्तान दर्ग्याची पाहणी करून सर्व मुस्लिम बांधवांच्या अडीअडचणी जाणुन घेऊन दर्गा परिसरातील रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावल्या जाईल असे उपस्थितांना बोलताना सांगितले याप्रसंगी दर्गा पुजारी कदिर पठाण,चेअरमन बापूराव पाटील,रामराव पा. टरके,अशोक पा. कळकेकर, प्रेमालताई ढगे, आरिपू भाभी, मुस्तफा पठाण, मोहम्मद पठाण, इस्माईल पठाण, गौस पठाण, अंकुश वाघमारे, अवधूत टरके, शाहूंराज ढगे आदी उपस्थित होते.

