टेंभुर्णी दि.२५ (प्रतिनिधी)
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माढा तालुकाध्यक्षपदी संपादक अंकुश आतकर यांची तर सचिवपदी बाबाफरीद पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पिंपळनेर(ता.माढा) येथे संपन्न झालेल्या बैठकीत जिल्हा कार्याध्यक्ष सुहास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या.
या पुढीलप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष महेश वाळूजकर,जिल्हा संघटक अशोक खारे,माढा तालुका कार्याध्यक्ष वसंत कांबळे,उपाध्यक्ष अरबाज पठाण,संघटक हनुमंत मस्तुद आदींना नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी पुढे बोलताना कांबळे म्हणाले राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ हा पत्रकाराच्या उन्नतीसाठी व न्याय्य हक्कांसाठी लढणारा बहुउदेशीय संघ असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष सुहास कांबळे यांनी सांगितले.

