*वडार समाजातील होतकरू, हुशार विद्यार्थ्यांस वसतीगृह मिळवण्यासाठी आणि त्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार:- बालाजी मंजुळे
मुंबई:- वडार समाजात अनेक हुशार ,होतकरु विद्यार्थी आहेत. प्रतिकुल परिस्थिती आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे मागे पडले आहेत. अशा मुलांना बळ देण्यासाठी वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वडार समाजाचे आय ए एस अधिकारी बालाजी मंजूळे यांनी यावेळी सांगितले.
वडार समाजातील एकमेव आय ए एस अधिकारी ज्यांनी आंध्रप्रदेश मध्ये जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्रात अपंग कल्याण विभागाचे आयुक्त, नंदुरबारचे जिल्हाधिकारी आता नुकत्याच मंत्रालयात रुजू झालेले, समाजातील एकमेव आय ए एस अधिकारी, समाजातील सर्व युवकांचे प्रेरणास्थान, माननीय बालाजी मंजुळे यांचा वडार समाज मंत्रालय टिमच्यावतीने स्वागत करण्यात आले, तसेच मंत्रालयीन कर्मचारी संघटनेचे नियुक्त नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र मंजूळे यांचाही यावेळी मंत्रालय टीमच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभ मंत्रालय टीमचे प्रमुख, महाराष्ट्र राज्यातील वडार समाजाचे समाज सेवक मनोहर बंदपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. हा कार्यक्रम मंत्रालयात संपन्न झाला. यावेळी महसुली विभागाचे राजू अलकुंटे, ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचे जनसंपर्क अधिकारी राजू धोत्रे, दत्ता धोत्रे, अशोक पवार, शेलार, पवार ,लष्करे, आदी मंत्रालय टीमचे सदस्य उपस्थित होते. यावेळी राजू अलकुंटे यांनी समाजातील एकमेव आय ए एस अधिकारी बालाजी मंजुळे हे मंत्रालयात आल्यामुळे मंत्रालय टीमला मोठी उर्जा मिळाली असून समाजाचा विकास होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. यापुढील काळात समाजाचे काम किंवा समाज पुढे घेऊन जाण्याचे काम अधिक गतीने होईल असे आपल्या मनोगतात सांगितले.
सुधीर पवार यांनी मंत्रालय टीमचे समाजासाठी चाललेल्या कामाची माहिती यावेळी दिली. राजू धोत्रे यांनी राज्यामध्ये सुरू असलेल्या मंत्रालय टीमच्या कार्याबद्दल माहिती दिली. मंत्रालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मंजुळे यांनी मंत्रालय कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्या बरोबर वडार समाजाच्या समाज कार्यात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

