shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुंडेगावचा आठवडे बाजार तत्काळ सुरू करण्याची मागणी..!!

नगर तालुका (प्रतिनिधी)- शिवा म्हस्के

आठवडे बाजार पुर्वी प्रमाणे चालु करण्यासाठी शेतकरी व्यापारी ग्रामस्थ मागणी करत आहे.शासनाने कोरोना पाश्र्वभूमीवर ज्या मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. त्या प्रमाणे आठवडे बाजार लवकरच  सुरू केला जाईल:-
एम.डी झावरे  प्रशासक, गुंडेगाव ग्रामपंचायत.

नगर तालुक्यातील बहुतांश गावातील  आठवडे बाजार  नियम व अटि शर्ती वर सुरु झाले आहेत. मात्र  नगर तालुक्यातील शेवटच्या हद्दीवर असलेले गाव गुंडेगाव येथील अद्यापि  आठवडे बाजार सुरू न केल्याने येथील शेतकरी व गामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत.गुंडेगाव ग्रामपंचायत प्रशासक मात्र येथील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करुन स्वस्थ बसल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायतीने गावातील आठवडे बाजार तातडीने सुरू करण्याची मागणी आता शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे..

   गुंडेगाव हे गाव नगर तालुक्यातील शेवटचे गाव म्हणून महत्त्वाचे असल्याने येथील बाजारपेठेत नागरिकांची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते.कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून गुंडेगाव येथील आठवडे बाजार गेली आठ ते दहा महिन्यांपासून बंद आहे.बाजार बंद असल्याने येथील छोट्या- मोठ्या शेतक-यांचा माल बाहेरचे व्यापारी अगदी कमी दराने खरेदी करून,ज्यादा दराने विक्री करीत आहेत,
मध्यंतरी कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांचा माल बाहेर विकू न शकल्याने शेतात सडुन गेला त्यानंतर निसर्गाने प्रकोप  केला आणि शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेल्या पालेभाज्या व इतर पिकासह अतोनात नुकसान होऊन शेतकरी पूर्णत: उद्वस्त झाला आहे.किमान आठवडे बाजार चालू झाल्यास शेतकऱ्यांना पालेभाज्या विकून त्यातून चार पैसे मिळवता येतील व गावांचे आथिर्क चक्र फिरेल व मुलांना  शाळे साठी लागणारे कपडे वहि पुस्तक घेतात येतील अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहे.  

परंतू आठवडे बाजार नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.तसेच गावातील ग्रामस्थांना आठवडे बाजार नसल्याने भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना दामदुप्पट पैसे देऊन ताजा माल मिळत नसल्याची खंत  येथील नागरीक करीत आहेत.त्यामुळे गावातील आठवडे बाजार सुरू करणे गरजेचे झाले आहे..

तसेच गावची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून गावच्या विकासाच्या दृष्टीने व नागरिकांच्या समस्या लक्षात घेता सोशल डिस्टन्सचे पालन करून आठवडे बाजार चालू करणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी गावचे *सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आगळे,माऊली कुताळ, संजय भापकर, सचिन जाधव, कानिफ सकट, व्यापारी वर्ग व  ग्रामस्थांनी केली आहे.
close