shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनिल पवार एक सामाजिक व्यक्तिमत्त्व.. वाढदिवस विशेष लेख..!!


इंदापूर प्रतिनिधी ( तात्याराम पवार)
इंदापूर :७/११/२०२०
वाढदिवस हा जीवनाची सुरुवात आणि आनंद अधोरेखित करणारा दिवस जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही तिचं भाग्य घेऊन या भूमीत जन्माला येत असतो त्यामुळे मिळालेले अनमोल असं आयुष्य हे प्रत्येकाने सुख समाधानाने हसत-खेळत जगणे गरजेचे आहे म्हणूनच आपण आपल्या वाढदिवसाला कमी लेखू नये हा दिवस म्हणजे या भूमीतील 


आपलालोषाचा आणि धन्यवाद देण्याचा असतो मग ते आपल्या घरच्या बरोबर सेलिब्रेशन करून असो नाहीतर एखादे चांगले सामाजिक कार्य करण्याचे अाशाच एका सामाजिक व्यक्तिमत्त्व जोपासणार्‍या असामान्य व्यक्तिमत्व असणारे इंदापूर शहरातील बाबा चौक येथे वास्तव्यास असणारे सुदाम पांडुरंग पवार हे व्यवसायनि दगड फोडणारी व नंतरच्या काळात त्यांनी बांधकाम व्यवसाय करीत आपल्या प्रपंचाचा गाडा चालवत सौभाग्यवती विमल पवार यांच्यासाथीने आई वडील भाऊ लहान थोर व्यक्तींच्या बरोबर मनमिळावू स्वभाव तून आपला संसाररूपी गाडा चालवत असताना एक सामाजिक व्यक्तिमत्त्व जपणारा मुलगा ७नोव्हेंबर१९८६ साली त्यांच्या पोटी जन्माला आला तो म्हणजे अनिल (अण्णा )पवार  यांचे शिक्षण प्राथमिक जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शिक्षण नारायणदास रामदास हायस्कूल उच्च शिक्षण कला वाणिज्य महाविद्यालय तर मेडिकल क्षेत्रातील डी फार्मसी चा कोर्स मिरज या ठिकाणी झाला त्यानंतर त्यांनी बाबा चौक येथे स्वतःचे मेडिकल व्यवसाय चालू केला या व्यवसायाचे उद्घाटन २००९  स*** डॉक्टर रोहिदास थोरवे आणि चुलते विश्वनाथ पवार यांच्या हस्ते करून मेडिकल क्षेत्रात पदार्पण केले.

आपल्या जीवनातील यशस्वी वाटचाल सुरू केली या माध्यमातून इंदापूर शहरातील व परिसरातील गरजू व अडचणीच्या काळात बिकट परिस्थितीत सापडलेल्या अनेक कुटुंबांना त्यांनी आपल्या सामाजिक विचारातून मदत देऊन आधार देण्याचे वास्तविक कार्य पार पाडले इंदापूर शहरातील असो अथवा बाहेरील ज्या लोकांवर दवाखाना क्षेत्रात जे काही मदत करता येतील तेवढे सहकार्य करण्याचे कार्य त्यांनी केले असल्याचे प्रत्यक्ष मदत करणाऱ्या व्यक्तींच्या उद्गार आतून दिसून आले मेडिकल क्षेत्रातील सर्व घटकांना त्यांच्यावर येणाऱ्या संकटांमध्ये आपले संकट समजावून ते दूर करण्याचे हे कार्य ते करीत असतात. 




सर्वांना मिळून मिसळून आपलंसं करणे आणि वेळप्रसंगी आर्थिक मदत करणे ही बाब आजच्या काळात सोपी नाही सर्वसामान्य घरातून गरिबीची जाण असणारे हे व्यक्तिमत्व सर्व जाती धर्मातील सर्व क्षेत्रातील लोकांच्या सुखदुःखात सामील होऊन कार्य करणारे हे नेतृत्व सामाजिक कार्यातून घडले आहे चालू परिस्थितीमध्ये कोरोना जन्य परिस्थिती शासनाने अचानक लॉकडाउन जाहीर केले अशा परिस्थितीमध्ये जी स्थिती निर्माण झाली त्या स्थितीत सामाजिक जाणिवेतून त्यांनी गोरगरीब जनतेला ३५० जीवनावश्यक किट देऊन आधार देण्याचे काम त्यांनी करून दाखविले पैसा भरपूर असतो दानधर्म अनेक जण करतात पण अशा परिस्थितीत इतरांसारखे अनिल पवार यांनीही फुल नाहीतर फुलाची पाकळी आपल्या हातून देण्याचे कार्य केल्याचे दिसले .


नगरसेवक स्वर्गीय बाळासाहेब पवार हे२००७  ते २०११ स*** ज्या वेळी नगरसेवक काँग्रेस पक्षातून झाले त्यांच्या विचारधारा चा अभ्यास करण्याची ही संधी व प्रेरणा त्यांना मिळाली त्यानंतर अनिल पवार यांच्या घरातील सौ कमल विश्वनाथ पवार या काँग्रेस पक्षातून नगरसेवक झाल्या त्यांच्याही कार्यकर्तृत्वाचा त्यांना विशेष प्रेरणा मिळत गेली या परिवाराला जोडले गेलेल्या जनतेला आपलेसे करण्याचे काम हे अनिल पवार करीत असल्याचे दिसत असल्याचे त्यांचे मित्रपरिवार सांगते याच काळात २०१६ साली ओपन कॅटेगरी तुन त्यांनी प्रभाग क्रमांक दोन मधून अपक्ष उमेदवारीतून नगरसेवक पदाची निवडणूक लढवली असताना निसटता पराभव स्वीकारावा लागला परंतु यातून ते खचून न जाता ज्या लोकांनी या निवडणुकीत साथ दिली त्यांना कोणत्याही स्वरूपात अडचण निर्माण होऊ दिली नाही असा प्रवास सामाजिक क्षेत्राबरोबर ते राजकीय क्षेत्रातही आपल्या स्वतःचा ठसा आपले मित्र आपले मेम्बर मित्रपरिवार या माध्यमातून ते करीत असल्याचे दिसून येत आहे 

त्यांनी मेडिकल असोसिएशन या संघटनेचे काम करीत असून तसेच वडार पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्य याचे उपाध्यक्ष म्हणून हे काम करीत आहे आज अनेक लोकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे कार्य आपल्या सामाजिक जाणिवेतून ते करीत असल्याचे त्यांचे चित्र दिसत आहे त्यांच्या कार्याबद्दल अजूनही भरपूर लिहिण्यासारखे आहे.


आज त्यांच्या वाढदिवसाचा हा अभिष्टचिंतन दिवस असून त्यांना  आज इंदापूर शहर शिवसेना मेजर सोमवंशी यांच्यावतीने वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच इंदापूर शहर सायकल क्लब प्रशांत दादा सिताब यांच्या वतीने तसेच विद्यानंद को-ऑपरेटिव बँक अधिकारी श्रेयस नलवडे यांच्यावतीने तसेच अक्षय सूर्यवंशी मित्रपरिवार यांच्यावतीने गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्यावतीने डॉक्टर विनोद राजपुरे यांच्या हॉस्पिटल च्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीतून आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा..!!
close