shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ह्युमन राईटस् राष्ट्रीय मानवाधिकार केंद्राच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी गोविंद तांदळे यांची निवड..!

सामाजिक कार्याची योग्य दखल, जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षांव..!!

अहमदनगर :  ह्युमन राईटस् राष्ट्रीय मानवाधिकार केंद्राच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी गोविंद तांदळे यांची निवड करण्यात आली. केंद्राचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. डॉ. संजय कांबळे साहेब यांच्या आदेशानुसार राज्य संपर्क प्रमूख मा. श्री. शामराव ननवरे सर यांनी ही निवड जाहीर केली.

 तसेच गोविंद तांदळे हे शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, वंचितांना न्याय देण्यासाठी काम करत आहेत. नूतन राज्य संघटक गोविंद तांदळे यांनी निवडीनंतर आपले मत व्यक्त करताना म्हणाले बहुजन सुखाय.. बहुजन हिताय.. या ब्रीद वाक्याप्रमाणे छञपती शिवाजी महाराज, धर्म वीर संभाजी महाराज, छञपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर समाजसुधारक महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, सुभाषचंद्र भोस, महात्मा गांधी या थोर विचारवंतांचा वारसा डोळ्यापुढे ठेवून जनतेच्या सेवेसाठी काम करणार आहे. या संघटनेच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार आहे त्याचबरोबर सांस्कृतिक, शिक्षण, कला-क्रिडा, चित्रपट, नाट्य अश्या विविध क्षेत्रातील प्रश्नांबाबत काम करणार असल्याचे गोविंद तांदळे यांनी सांगितले यावेळी मनोहर गुंडगिरे यांची सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून व प्रकाश नन्नवरे यांची करमाळा तालुकाध्यक्ष म्हणून निवडी करण्यात आल्या. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ह्युमन राईटस् राष्ट्रीय मानवाधिकार केंद्राचे राज्य संपर्क प्रमूख नन्नवरे सर यांनी अभिनंदन केले.

तसेच राज्य संघटक पदी गोविंद तांदळे यांची निवड झालेबद्दल Occi (वडार /ओड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री दिपक पवार साहेब ,मा. श्री. बाळासाहेब ईटकर, मा. श्री कृष्णा नलावडे राज्य संपर्क प्रमूख (Occi) या मान्यवरांकडून आणि अनेक सामाजिक संघटना, राजकीय, संस्था, नागरिकांनी त्यांच्या या निवडीचे स्वागत केले जात असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
close