shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रावसाहेब पाटील शिंदे हळदेकर व बालाजी वैजाळे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड..!

लोहा ,कंधार (प्रतिनिधी) लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष ,लोकप्रिय आमदार शामसुंदर शिंदे यांचे बंधू तथा माजी जि. प. सदस्य रावसाहेब पाटील शिंदे हळदेकर व माजी जि. प. सदस्य बालाजी वैजाळे यांची महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने नांदेड जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नेमणूक केली आहे, 
          मा. रावसाहेब पाटील शिंदे, हळदेकर

महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने दि. 9 नोव्हेंबर 2020 च्या पत्रकान्वये रावसाहेब पाटील शिंदे हळदेकर व बालाजी वैजाळे यांच्यासह एकूण 14 जणांची नियोजन समितीवर नियुक्ती केल्याचे पत्र नुकतेच शासनाच्या नियोजन विभागाने काढले आहे. लोहा, कंधार चे आमदार शामसुंदर शिंदे यांचे बंधू तथा माजी जि.प. सदस्य रावसाहेब पाटील शिंदे हळदेकर यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली असून, रावसाहेब पाटील शिंदे हे मुत्सद्दी राजकारणी व समाजकारणी  म्हणून  शिंदे यांची लोहा, कंधार तालुक्यात ओळख आहे,  

                 मा.बालाजी वैजाळे

तळागाळातील सर्वसामान्यांचे खंबीर नेतृत्व म्हणून रावसाहेब पाटील शिंदे यांना  ग्रामीण भागातून  ओळखल्या जाते, एक सच्चा समाजकारणी रावसाहेब पाटील शिंदे व बालाजी वैजाळे यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याने रावसाहेब पाटील शिंदे हळदेकर व बालाजी वैजाळे यांचे  यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी नूतन निमंत्रित सदस्य रावसाहेब पाटील शिंदे व बालाजी वैजाळे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत .
close