लोहा । प्रतिनिधी :
लोहा शहराच्या विकासासाठी पत्रकार बांधवांनी काही सुचना कराव्यात असे प्रतिपादन लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी केले.
लोहा येथील नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिपावली निमित्त लोहा येथील पत्रकार बांधवांसाठी स्नेह मेळावा व सत्कार , चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, गटनेते करीम शेख, नगरसेवक संदीप दमकोंडवार, अमोल व्यवहारे, केतन खिल्लारे,नबी शेख, दिनेश मोटे, संजय चव्हाण, यशपाल निर्मले ,लकी फुलवरे, आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी म्हणाले की, आमच्या कडून काही चुका होत असल्या तर आपण आम्हाला सांगावे पत्रकार बांधव पहिल्या पासून आमच्या सोबत आहेत व पुढे ही राहतील अशी अशा व्यक्त करतो . शहराच्या विकासासाठी काही सुचना असल्या तर आपण कराव्या आपली सुचना आम्ही स्वीकारू लोहा शहराचा विकास करू शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा एका वर्षात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अशी ग्वाही शहर वासियांना देतो .
शहरात रस्ते , वीज , पाणीपुरवठा या मुलभूत सुविधाना प्राधान्य देण्यात येईल. तसेच लिंबोटी धरणातून कायम स्वरुपी पाणीपुरवठा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोलीस स्टेशन व बांधकाम विभागाची जागा नगर परिषदेला मिळावी तेथे शाॅपींग सेंटर काढण्याची योजना आहे त्यामुळे न.पा.चे उत्पन्न वाढेल.
लोहा शहरातील जेथे जेथे कामे झाली नाहीत तिथे कामे करूत असे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी म्हणाले.
तसेच यावेळी जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे, बापू गायकर, रत्नाकर महाबळे , साहेबराव सोनकांबळे ,यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले तर आभार जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले यांनी मानले.

