shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आंबेसांगवी येथे आशाताई शिंदे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन..!!

आंबेसांगवी येथे आशाताई शिंदे यांच्या हस्ते  रक्तदान शिबिराचे उदघाटन..!!

 लोहा । प्रतिनिधी: लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आ. शामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या हस्ते काल शनिवारी लोहा तालुक्यातील आंबे सांगवी येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी लहुजी सेना  आंबेसागवी शाखेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या आशाताईं शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमा प्रसंगी रक्तदान केलेल्या रक्तदात्याना आशाताईंच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, यावेळी व्यासपीठावरून बोलताना आशाताई शिंदे म्हणाल्या की,प्रत्येकाने आपापल्या वाढदिवसाला इतर वायफळ खर्च टाळून रक्तदाना सारखे समाजपयोगी कार्यक्रम राबवावेत. 

यावेळी श्यामअण्णा पवार,सिद्धू पा. वडजे,अशोक पा. कळकेकर,अनिल पाटील,माधवराव आंबटवार,अशोक सोनकांबळे , संभाजीराव गारोळे,प्रदीप वाघमारे,अविनाश होळगे,शंकर मात्रे,सुरेश दुबे,दयानंद दुबे,राजू दुबे,तिरुपती दुबे सह विद्यार्थी, महिला ,गावकरी मंडळी सह पत्रकार  सह 
कार्यक्रमाचे आयोजक स्वप्नील गव्हाणे उपस्थित होते.
close