इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ह्यूमन राइट्स मानवाधिकार , अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिति, विश्व वारकरी सेना व श्रमिक पत्रकार संघ पदाधिकाऱ्यांचा गौरव
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ह्यूमन राइट्स मानवाधिकार , अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिति, विश्व वारकरी सेना व श्रमिक पत्रकार संघ पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
पत्रकार हा समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचे वास्तववादी लिखाण करुन खरेखुरे चित्र समाजाच्या पुढे आणण्याचे काम करत असल्याचे मत शेटफळ हवेली ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.रुपाली संतोष पवार यांनी व्यक्त केले.
शेटफळ हवेली (ता. इंदापूर ) येथील ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय गरीबी निर्मुलन समिती,विश्व वारकरी संघटना, ह्युमन राइट्स जनहित मानवाधिकार संघटना व श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकारी गौरव समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ह्यमन राइट्स जनहित मानवाधिकार संघटनेचे नूतन पुणे जिल्हाध्यक्ष पत्रकार कैलास पवार, विश्व वारकरी सेना संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष, व श्रमिक पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र संघटक आबासाहेब उगलमोगले,अखिल भारतीय गरीबी निर्मुलन समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष काकासाहेब मांढरे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय कळमकर,पुणे जिल्हा संपर्कप्रमुख दीपक खिलारे,श्रमिक पत्रकार संघाचे इंदापूर तालुका सरचिटणीस व साहाय्यक संघटक इम्तियाज मुलाणी, आधार न्यूजचे पुणे जिल्हा ब्यूरो चीफ जितेंद्र जाधव, शिर्डी एक्सप्रेसचे इंदापूर तालुका प्रतिनिधी तात्यासाहेब पवार यांचा यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
शेटफळ हवेली ग्रामपंचायत सदस्य माऊली निंबाळकर म्हणाले की, पत्रकारांनी कोरोनाच्या कालावधीत आपला जीव धोक्यात घालून वार्तांकन करुन जनतेमध्ये जनजागृती करण्याचे काम केले आहे. पत्रकार हे पत्रकारीतेबरोबरच समाजामध्ये सलोखा जपण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले.
यादरम्यान अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख काकासाहेब मांढरे,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे इंदापूर तालुका सचिव धनंजय कळमकर,इलेक्ट्रॉनिक मिडिया व प्रिंटचे पत्रकार कैलास पवार यांचे हस्ते टाइम्स् २४ न्यूजचे श्रेयश नलवडे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्य माऊली निंबाळकर यांनी केले तर आभार पत्रकार श्रेयश नलवडे यांनी मानले.
या कार्यक्रमास शेटफळ हवेलीचे जेष्ठ मार्गदर्शक पांडुरंग आबा शिंदे, संतोष पवार, ग्रा.पं.सदस्य माऊली निंबाळकर, ग्रा.पं.सदस्य मेजर मारुती निकम, ग्रा.पं. सदस्य धनाजी चव्हाण, ग्रा.पं.सदस्य महेश नरबट, संताजी नलवडे, सचिन फडतरे, मेजर विठ्ठल पडळकर, विजय नरबट, तेजस चव्हाण, विजय पांडुरंग शिंदे, धनाजी साठे, प्रमोद चव्हाण, सूरज चव्हाण, आबा पवार, सचिन चव्हाण, लखन नरबट, विशाल शिंदे, सुयोग सावंत, गणेश पताळे, संजय जाधव, शिवाजी निरगुडे, लक्ष्मण चव्हाण, सतिश नरबट, रायबा नरबट, विनोद शिंदे उपस्थित होते.

