पुणे पदविधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार..!
पुणे पदविधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार....!
महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड यांच्या उपस्थितीत इंदापूर येथील महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज्यमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी विश्वास व्यक्त केला ..!
इंदापूर। प्रतिनिधी :
इंदापूर:१८ नोव्हेंबर २०२०.: महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ इंदापूर शहरातील गुरूकृपा सांस्कृतिक भवन येथे (दि.१७) राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस,काॅंग्रेस, शिवसेना,पी.आर.पी.(कवाडे गट)शेकाप,प्रहार संघटना यांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्त्वपूर्ण मिटींग संपन्न झाली.
मिटींगच्या प्रारंभी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपस्थितांनी शाब्दिक अभिवादन केले.मिटींगच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, कार्याध्यक्ष अतुल झगडे,काॅंग्रेसचे तालूकाध्यक्ष स्वप्निल सावंत, शिवसेनेचे तालूकाध्यक्ष नितिन शिंदे,पी.आर.पी.कवाडे गटाचे संजय सोनवने यांनी आपली मनोगते मांडताना इंदापूर तालुक्यातून जास्तीत जास्त मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळण्यासाठी आम्ही सर्व एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांनी पदविधर मतदारसंघातून अरूण लाड यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरोघरी पोहचण्याचे आवाहन यावेळी केले.
राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी पुणे पदविधर मतदारसंघ हा देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या विचारांना मानणारा मतदारसंघ असून पुणे पदविधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड यांना क्रांतिकारी विचारांचा वारसा असून उद्याच्या होणारे निवडणुकीत महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास नामदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी पुणे पदविधर मतदारसंघातून शरद पवार व महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील राज्यपातळीवरील वरिष्ठ नेतृत्वांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी दिली या निवडणूकीच्या माध्यमातून आपण मला मतदानरूपी आर्शिवाद देऊन काम करण्याची संधी देण्याचे आवाहन अरुण लाड यांनी उपस्थितांना केले.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मा.सदस्य प्रतापराव पाटील, पुणे जिल्हा शिवसेनेचे समन्वयक विशाल बोंद्रे, बाळासाहेब करगळ,माजी तालूकाध्यक्ष महारूद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी.एन.काका.जगताप, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव शिंगाडे, अभिजित रणवरे,माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, माजी उपनगराध्यक्ष दिलिप वाघमारे,जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, जेष्ठ नेते दत्तामामा घोगरे,माजी अध्यक्ष विजयराव शिंदे, पंचायत समिती सदस्य संजीव लोंढे, विरेंद्र रणसिंग,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालूकाध्यक्षा सौ छायाताई पडसळकर,काॅंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, शहराध्यक्ष तानाजी भोंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिध्दी प्रमुख वसंत आरडे,प्रहार संघटनेचे संजय राऊत,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संतोष ननवरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अनिल राऊत, इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब ढवळे, मखरे सर, स्वप्निल राऊत,पुणे जिल्हा पदविधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन खामगळ, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष ईकबाल शेख, नवनाथ रुपनवर, ज्ञानदेव डोंबाळे,वसीम बागवान,यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

