नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :
नगर-सोलापूर हायवे रस्त्या लगत असलेले तिर्थक्षेत्र श्री राम मंदिर देवस्थान, दहिगाव साकत या ठिकाणी अहमदनगर ते गाणगापुर या बसला अधिकृत बस थांबा असावा अशी मागणी अनेक दिवसांपासून भक्त मंडळी ग्रामस्थ करत होते. या बस थांबा मागणीच्या पाठपुराव्या कामी आज शिष्टमंडळ विभागीय कार्यालयात अहमदनगर या ठिकाणी गेले असता. अहमदनगर ते गाणगापूर या बसला अधिकृत बसं थांब दहिगाव साकत या ठिकाणी तुमच्या मागणी प्रमाणे बसला अधिकृत बस थांबा म़ंजुर केला आहे.
संबंधित अधिकारी यांनी असे कळवले आहे. या प्रसंगी ओम दत्त जनार्दन स्वामी आश्रम गाणगापूर चे अध्यक्ष ह.भ.प सावंत महाराज यांनी विभागीय नियंत्रक विजय गिते, तारकपूर आगार प्रमुख व्यवस्थापक कल्हापूरे, श्रीमती ज्योती गायकवाड, यांचा शाल श्रीफळ देऊन छोटासा सत्कार केला.
या प्रसंगी दहिगावाचे संरपच मधुकर म्हस्के, अशोक दांडगे, सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के,संदिप वाळके या बसला अधिकृत बस थांबा दिल्यामुळे सर्व भक्त मंडळींनी सर्व एसटी महामंडळाचे अधिकारी कर्मचार्याचे चे आभार मानले.

