shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विलास करडे यांची मल्हार आर्मीच्या केज तालुकाध्यक्ष पदी निवड..!!

केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे  :-
तालुक्यातील मांगवडगाव येथील रहिवासी चळवळीतील कार्यकर्ते विलास साहेबराव करडे यांची मल्हार आर्मी संघटनेच्या केज तालुका अध्यक्ष पदी निवड झाली. 


यावेळी नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत कांबळे,कार्याध्यक्ष बाळासाहेब बंडगर ,सचिव गणपत देवकते,प्रदेश अध्यक्ष काकासाहेब मारकड आदींच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.या निवडीबद्दल प्रदीप निगुळे, वैजनाथ डोने, श्याम निर्मळ, अशोक शिंदे, नितीन धायगुडे, वैभव पानढवळे आदींनी अभिनंदन केले आहे.उपेक्षित घटकांच्या प्रश्नासाठी ,हक्कासाठी काम करत राहणार.संघटन बांधणी चे कार्य जोमाने करणार असल्याचे यावेळी करडे यांनी सांगितले .
close