shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव तालुक्यातील भंडारी येथील शेतकऱ्याची अतिवृष्टीमुळे गळफास घेऊन आत्महत्या..!!

हिंगोली। प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.०८,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील भंडारी येथील शेतकरी सुभाष शेषराव राठोड(४८)यांनी अतिवृष्टीमुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे या ताणामुळे दि.०७ नोव्हेंबर शनिवार रोजी सायंकाळी साडेसहा च्या सुमारास गळाफास घेऊन आपले जिवन संपविल्याची खळबळजनक घडना घडली असुन याप्रकरणी सेनगांव पोलीसात आकस्मित मृत्यु म्हणुन नोंद करण्यात आली आहे.


सेनगांव तालुक्यातील मौजे भंडारी येथील शेतकरी सुभाष शेषराव राठोड(४८) यांच्याकडे कोरडवाहु जमिन असुन त्यांनी स्टेट बँक आँफ इंडीया शाखा सेनगांव कडुन पिककर्ज म्हणुन १ लाख ६० हजार रुपये कर्ज घेतले होते.परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन,मुग व उडीद हातचे गेले.यावर्षी पेरणी केली लागवड खर्च ही निघाला नाही अन शासनाकडुन पिककर्ज माफ झाल्याचे ऐकुन सदर शेतकरी सुभाष राठोड हे स्टेट बँक आँफ इंडीया शाखा सेनगांव येथे जाऊन शाखा व्यवस्थापक यांना भेटण्यास गेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिल्याने घेतलेले पिककर्ज कसे फेडावे म्हणुन ते सतत तणावत असल्याची माहीती नातेवाईकांनी दिली.यावर्षी अतिवृष्टीमुळे लावलेला खर्च देखील वसुल झाला नाही व पिककर्ज कसे फेडावे? तसेच घरखर्च कसा करावा या तणावातुन शेतकरी सुभाष शेषराव राठोड यांनी दि.०७ नोव्हेंबर शनिवार रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घडना घडली असुन याप्रकरणी राधेशाम देविदास राठोड यांच्या फिर्यादीवरून सेनगांव पोलीस स्टेशनला दि.०८ नोव्हेंबर रविवार रोजी आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
close