shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गणेशवाडी येथे शॉर्ट सर्कीट मुळे ४० एकर उस जळाला ८ ते १० शेतकर्‍यांचे नुकसान ..?

प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई : सोनई जवळिल गणेशवाडी येथे विद्युत ताराच्या शॉर्ट सर्कीट मुळे ८ ते १० शेतकर्‍यांचा सुमारे ४० एकर तोडणीला आलेला ऊस जळून खाक झाला. या आगीत काही शेतकर्‍यांचे ठिबक सिंचन इलेक्ट्रीक बॉक्स, पाईप आदी शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले अर्थाअत पावसाने पार होत्याचे नव्हते करुन टाकले आहे त्यात हे नवे संकट समोर उभे राहिले आहे. 

ऊस जळालेल्या शेतकरी पुढील प्रमाणे आहेत. दामोदर काळे (दोन एकर) विजय दरंदले(साडेचार एकर), हरिभाऊ काकडे( नऊ एकर), श्री.गिते(दोन एकर), आदिनाथ तांदळे (चार एकर), नरेंद्र तांदळे(चार एकर), सुभाष तांदळे(दोन एकर), इत्यादी असे सुमारे चाळीस एकर क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी पडल्याने मोठी आर्थिक हाणी झाली आहे. या ठिकाणी रस्त्यावर पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडल्याने त्या ठिकाणी अग्नीशामक वाहन पोहचू शकले नाही. 

परीसरातील नागरीकांनी ही आग आटोक्यत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने जवळपास असलेले आणखी उसाचे क्षेत्र या पासून वाचले या घटनेची माहिती मिळताच मुळा सहकारी साखर कारखाण्याचे शेतकी अधिकारी फाटके व त्यांच्या सहकार्‍यांनी पाहणी केली मागील आठवड्यात भुसारी वस्ती वरील भुसारी यांचा दहा एकर ऊस जळून खाक झाला. 

परिसरातील विद्युत वाहिनीच्या तारा अत्यंत खराब झालेल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये अत्यंत कठिण परीस्थीती निर्माण होणार असल्याने विद्युत मंडळाच्या कडून या विद्युत ताराची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. एकतर शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना आता हाताशी आलेले पीक हे वाया जात आहे.
close