पुणे:-भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल असल्याचे भाषण पुण्याच्या किरकटवाडी परिसरात फिरणाऱ्या एका तोतयाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. अंकित कुमार सिंह (वय 23 सध्या राहणार उत्सव सोसायटी किरकट्वाडी मूळ राहणार हसनपूर, आमरोह, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे, लष्कराचा पोषाख, दहा ओळखपत्रे, दोन मोबाईल, एक टॅब, प्रिंटर, लॅपटॉप, लष्कराची महत्त्वाची ओळख चिन्हे, लष्करी बूट, पट्टा, लष्कराचे चिन्ह असलेली टोपी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना एक व्यक्ती लष्कराच्या पोशाखात फिरत असून तो लेफ्टनंट कर्नल असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी किरकिटवाडी परिसरातून त्याला ताब्यात घेतले. तो सांगत असलेली पत्नी मीनाक्षी हिला देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
हवेली पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

