shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोहा न पा च्या वतीने मुख्य रस्त्यावर पाणी मारण्याची मोहीम सुरू ..!!

लोहा । प्रतिनिधी : शहरातून नांदेड तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असून या रस्त्याचे काम काही तांत्रिक अडचणीमुळे थांबले आहे यामुळे या रस्त्यावर मोठं मोठी खड्डे पडली आहेत रस्त्याचा धुराळा झाला आहे रस्त्यावरून वाहने चालवणे आणि पायी चालणे पण कठीण झाले आहे सद्या दिवाळी ची धामधूम सुरू असल्याने शहरात जनतेची गर्दी वाढली आहे रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली नागरिकांना रस्त्याच्या धुरळ्याचा त्रास होऊ नये त्यांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी न पा प्रशासनाच्या वतीने मुख्यरस्त्यावर सकाळी पाणी मारणे मोहीम सुरू केली असल्याने रस्त्यावर काही अंशी धुरळा बंद झाला आहे यामुळे जनतेतून न पा प्रशासनाचे अभिनंदन केले जात आहे.

शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात आहे या रस्त्यावर जागोजागी मोठं मोठी खड्डे पडली आहेत असे असताना ही हा रस्ता न पा किंवा सा बा विभागाच्या अधिपत्याखाली येत नसल्याने रत्याचे काम करणे शक्य नाही. रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे म्हणून नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी आपल्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे अनेक वेळा मागणी केली.

 पत्रव्यवहार केला पण काही तांत्रिक अडचणीमुळे रस्त्याचे काम रखडले आहे. खा चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. पण तत्पूर्वी रस्त्यावर पडलेल्या खंड्याचा त्रास जनतेला होऊ नये म्हणून शहरातील खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात आले रस्त्यावर मुरूम टाकल्याने रस्त्यावरून वाहनांची वाहतूक होऊन रस्त्यावर धुरळा झाला. दिवाळी सण आहे , या काळात शहरात गर्दी अधिक होत असते. या धुरळ्याचा त्रास नागरिकांना होऊ नये म्हणून नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी शहरातील मुख्यरस्त्यावर दररोज टँकर ने पाणी मारण्याचा निर्णय घेतला आणि  पंधरा दिवसापासून रोज सकाळी रस्त्यावर पाणी मारण्याची मोहीम सुरू झाली. यामुळे धुरळा कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळाला आहे यामुळे न पा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मोहिमे बद्दल समाधान व्यक्त केल्या जात आहे.
close