हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१२,महाराष्ट्र राज्यात सध्या पदवीधर निवडणूकाचे बिगुल फूंकले आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकी साठी अनेक उमेदवार रिंगणात आपले नशिब आजमावण्यासाठी निवडणूक कार्यालयात नामाकन अर्ज भरत आहेत.अशातच अौरंगाबाद चे आम आदमी पार्टी चे उमेदवार आपल्या खास कोरोना सरंक्षण किट परिधान करून कोरोना जनजागृती संदेश देते थेट लक्ष्यवेधून आज अौरंगाबाद विभागीय आयुक्तालयातील निवडणूक कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केला. ह्या टर्म ची निवडणूक रंगात येणार आहे. राष्ट्रवादीचे सतिश चव्हाण भाजपचे शिरीष बोराळकरांना यावेळेस मोठे आव्हान देण्यासाठी आम आदमी पार्टी चे मराठवाडा उमेदवार डॉ रोहित बोरकर ह्यांचे मोठे आव्हान असणार आहे.
मराठवाड्यात तरूण पदवीधरांसाठी केलेली आंदोलने, शिक्षक भरती लढा, स्थापत्य अभियांत्राीकी लढा कृषी पदवीधर लढा, स्पर्धा परिक्षा समस्या लढा, डॉक्टर भरती लढा ई गोष्टीत सातत्याने ग्राउंड वर दोन करत यशस्वी लढा देत डॉ रोहित बोरकर आज पदवीधर मतदारसंघ चेहरा मोहरा बदण्यासाठी सज्ज झालेत.
डॉ रोहित शिवराम बोरकर हे अत्यंत गरीब कुटुंबातील असुन हिंगोली जिल्ह्यातील मागस असलेल्या सेनगांवचे आहेत व त्यांनी अहिल्या आरोग्य हेल्पलाइन चे जाळे मराठवाड्या सह सबंध महाराष्ट्र राज्यात पसरले आहे. हजारो रूग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून दिलेत,वैद्यकिय अर्थिक मदत, मोफत वैद्यकिय सल्ला,
मोफत रूग्ण वाहिका, मोफत आरोग्य शिबीरे इ कार्य त्यांची विकास कामाची पोचपावती देते.सनशाईन एज्युकेशनल मेडि-टेक माध्यममातून मोफत रोजगार, मोफत शिष्यवृती,मोफत शैक्षणिक सेमिनार सर्व मराठवाड्यात पदवीधरांसाठी कार्य केले. डॉ बोरकर यांच्या मराठवाडा जनविकास पदवीधर समितीने गेली वर्ष भर पदवीधर नोंदणी अभियान राबवत जनजागृती करत एक लाख च्या वर नोंदणी केली.
राजधानी दिल्लीचा विकासाने चेहरा मोहरा बदलणारे व दुसरी टर्म मुख्यमंत्री पद भुषविणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद जी केजरीवाल साहेबांच्या थेट नियुक्तीने डॉ रोहित बोरकर यांची पार्टी च्या वतीने उमेदवारी वर शिक्का मोर्तब झाले.पार्टी ची ध्येय धोरणे व कार्य पद्धतीने व बोरकरांच्या विजयी वाटचाल सूरू आहे. हि संधी भविष्यात सर्वस्वी लढा देत "दिल्ली पँटर्न " सबंध मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राबिवणार आहे व विकासात्मक दृष्टीकोण ठेऊन कार्य करण्याचा निर्धार उमेदवारी अर्ज दाखल करत पत्रकारांशी संबोधले.
यावेळी मराठवाडा विभागीय अध्यक्ष व राज्य समिती सदस्य डॉ.सुभाष माने, प्रसिध्दी प्रमुख सुग्रीव मुंडे,शहर सचिव आशिर जयहिंद,सोशल मिडीया सचिन पारधे, सदस्य शुभम सशे उपस्थित होते.

