अक्षय तोटावार मित्र क्रीडा मंडळ, पाटणबोरी यांच्या वतीने कर्मवीर दादासाहेब उपाख्य मा. सा.कन्नमवार यांच्या स्मरणार्थ ..!!
पाटणबोरी । अक्षय तोटावर :
सदर स्पर्धेला पाटणबोरी तील जनता हायस्कूल येथे शुक्रवारी दमखदार सोहळ्यात सुरवात झाली.
डॉ.रोहित दादा माडेवार ( नागपुर )यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.राजेश्वर गोंड्रावार ( सभापती पं.स.झरीजमणी ) हे होते...!
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटी फाउंडेशनचे मार्गदर्शक प्राध्यापक प्रदीप केचे सर ,सुबोध जंगम ( रोटी फाउंडेशन नागपूर )विकास कांबळे ( रोटी फाऊंडेशन नागपूर ),हनमंतु रजनलवार साहेब ( माजी जिल्हाध्यक्ष युवा बेलदार समाज संघटना , यवतमाळ ) अनिल कर्लावार ( अध्यक्ष युवा बेलदार समाज संघटना शाखा, पाटणबोरी );गंगारेड्डी सुंकुरवार ( सल्लागार समिती युवा बेलदार समाज संघटना शाखा, पाटणबोरी ) विनोद निम्मलवार ( सरपंच पाटणबोरी ); विलास वाघमारे सर; रामलूजी अडपावार ( सेवानिवृत्ती शिपाई ); चिनय्या मिरलवार ( ग्रा.पं. सदस्य पाटणबोरी ) सुधाकर ईम्मडवार, आणि गावातील प्रतिष्ठ नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
खेळाडूंनी नियमित योग करावेत..
यावेळी डॉ.रोहित दादा माडेवार म्हणाले की आज जनता हायस्कूल पाटणबोरीत क्रिकेटचे सर्कल खुले करून सामन्यांचे सुंदर नियोजन करण्यात आले. या क्रीडा सामने साठी पाटणबोरी गावातील , कोपामंडवी गावातील, वणी शहरातील, नागपूर शहरातील , मांडवी गावातील, देणगीदारांनी भरीव मदत केली आहे. ही आनंदाची बातमी आहे.
यामुळे खेळाडूंचा उत्साह निश्चित वाढेल. खेळात व आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.परीश्रमही खूप महत्त्वाचे आहे.आणि निरोगी राहण्यासाठी शरीरस्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी योग आणि ध्यान करणेही गरजेचे आहे. विध्यार्थी खेळाडूंनीही नियमित योग व ध्यान करावे.असे आवाहन डॉ.रोहित दादा माडेवार यांनी केले.
यावेळी अक्षय तोटावार मित्र परिवार सदस्य गणेश पिकलीकवार, गणेश कटकमवार, आकाश दोनकोडावार, अभिषेक दासपतवार , मयूर मोहिजे, साईनाथ परशावार, गणेश कांदसवार, विवेक पिल्लेवार, अनिकेत सीडाम , साईकिरण अडपावार, वंश कुरलेवार ,संदिप केमेकर सर , सचिन पत्राकार, दत्तात्रय देवलवार, राकेश मदीकुंटावार, अशोक गंड्रतवार , लोकेश निलेवार, शेखर मुत्यालवार, रिजू, रफिक शेख , व बाहेर गावातील संघ हजर होते.
या कार्यक्रमाचे सुञसंचलन विलास वाघमारे सर यांनी केले.

