shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे शहर पोलिसांची कामगिरी सराईत गुन्हेगाराकडून 3 पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त..!


पुणे:-समर्थ पोलिसांचा तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्या ताब्यातून तीन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.


आकाश भगवान त्रिभुवन (वय 25) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तपास पथकातील कर्मचाऱ्यांना एक व्यक्ती पुणे-मुंबई महामार्गावर पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बालेवाडीतील स्कोडा शोरूम जवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याचा अंगझडतीमध्ये तीन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे सापडली.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संतोष काळे, हेमंत पेरणे, बाळासाहेब पाटोळे, दत्ता सोनवणे, निलेश साबळे, सुभाष मोरे शुभम देसाई यांनी केली.
close