जनसामान्यांचे नेतृत्व राजवर्धन पाटील यांनी फोन करून सुसन हॉस्पिटल मधील संबंधित डॉक्टर यांना कवळे रुग्णाची काळजी घेण्याचे केल्या आव्हान.
इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर: दि.१६ डिसें.२०. इंदापूर तालुक्यातील चिखली येथील शीतल नामदेव कवळे वय १६ वर्षे या मुलीला त्यांच्या राहत्या घरी सकाळी पाणी तापवत असताना तिच्या अंगावरील कपड्याला आग लागल्याने ती ४० टक्के भाजली गेली. सदर मुलगी मतिमंद आहे. कवळे कुटुंबाची परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने सदर कुटुंबाला तेथील खाजगी रुग्णालयातील खर्चामुळे दोन दिवसांनी (दि.१३) ससून हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले . कवळे कुटुंब अतिशय गरीब असल्याने फक्त तीनशे रुपये घेऊन या ठिकाणी थांबलेल्या कुटुंबाला मदतीच्या हाताची गरज होती.
म्हणून आपल्या गावातला मुलगा पुण्यात राहतो म्हणून मला फोन केला. मी सुसन हॉस्पिटल या ठिकाणी ताबडतोब पोचलो तर त्या रुग्णाची आणि त्या कुटुंबाची अवस्था पाहून मला काहीच सुचेना अशी अवस्था निर्माण झाली .अशा काळात या कुटुंबाला कपडे अंथरून पांघरून घेण्यासाठी बेडशीट याची गरज होती .तसेच या कुटुंबाला जेवण व खर्चासाठी पैशाची आवश्यकता होती अशा परिस्थितीत शिवछावा मावळा संघटनेचे सुजितदादा करळे यांना ही परिस्थिती फोनवरून सांगितली असता. कसल्या ही प्रकारचा विलंब न लावता या कुटुंबासाठी कपडे, अंथरूण-पांघरूण, जेवण रुग्णासाठी ड्रेस घेऊन सदर कुटुंबाला आर्थिक मदत ही त्यांनी केली. तसेच येथून पुढे कोणतीही मदत हवी असल्यास ही मदत करण्याची तयारीही त्यांनी त्या कुटुंबास देण्याची ठरवले. यावेळी शिवछावा मावळा संघटनेचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव उपस्थित होते. याच वेळी सुजित करळे यांनी जनसामान्यांचे नेतृत्व राजवर्धन पाटील यांना या कुटुंबाच्या रुग्णास संदर्भात माहिती दिली असता. कोणताही विलंब न लावता तत्परतेने संबंधित डॉक्टरांना फोनवरून सूचना दिल्या . राजवर्धन पाटील व सुजित करळे यांनी दिलेला आधार हाच या कुटुंबाच्या व रुग्णाच्या जीवनाला उभारी देणारा ठरणार आहे .अशी मदत करणारी देवासमान माणसं आज प्रत्यक्ष पाहण्यास मिळाली याचे मला धन्यता वाटते. कवळे रुग्ण लवकरात लवकर बरे होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो . अशी सर्व माहिती चिखली गावचे संतोष गायकवाड यांनी दिली

