shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिताताई पाटील यांचे आरोग्य कर्मचाऱ्यांना बद्दल गौरवोद्गार...!!

आरोग्य कर्मचारी   विविध प्रकारे आपल्या सर्वांचे कोविड पासून रक्षण करत आहेत ते  करत असलेले कार्य खूप उल्लेखनीय .


इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
बावडा: २ डिसेंबर २०२० .काल पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा कु.अंकिता हर्षवर्धन पाटील या पुणे पदवीधर मतदार संघाचे मतदान करण्यासाठी बावडा येथे गेल्या असता, तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व त्यांची विचारपूस केली. तसेच स्वतःची ही काळजी घेण्याकरिता विनंती, यावेळी अंकिताताईंनी केली.
           

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण दक्षता घेत व सूचनांचे पालन करीत  पुणे पदवीधर व शिक्षण मतदार संघाची मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मार्फत  डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने आलेल्या प्रत्येक मतदाराची तापमान तपासणी, पल्स ऑक्सिमीटर’ने तपासणी व सॅनिटाइझिंग केल्यानंतरच  मतदाराला पुढील प्रक्रियेसाठी मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येत होता.
      

आरोग्य कर्मचारी गेले नऊ-दहा महिने पासून विविध प्रकारे आपल्या सर्वांचे कोविड पासून रक्षण करत आहे, ते विविध पद्धतीने कोविड वर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. ते करत असलेले कार्य खूप उल्लेखनीय आहे त्यांच्या या कार्याला माझा सलाम.असा ही गौरवोद्गार कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी केले.
close