श्रीरामपूर -केंद्र सरकारने केलेले कृषी व कामगार कायदे मागे घेण्यात यावे दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी कामगार नेते नागेश सावंत यां च्या नेतृत्वाखाली एम.आय.डी.सी कामगार आयडीया टॉवर कामगार, ट्रान्सपोर्ट हमाल-माथडी कामगार ,महाबीज कामगार, सिमेंट युनियन कामगार, पेठ हमाल माथडी कामगार, शेतमजूर, हातगाडी कामगार, रिक्षा युनियन आदी कामगारांसह मराठा स्वयं सेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी शनिवार दि.५/12/2020 रोजी सकाळी 12.00 वा. छत्रपती संभाजीराजे चौक येथे कृषी व कामगार कायद्याविरूध्द आंदोलने केले.
केंद्र सरकारने कामगार व शेतकऱ्यांविरुद्ध काळे कृषी कायदे केले हे कायदे भांडवल दार धार्जीण असून यामुळे कामगार, कष्टकरी, शेतकरी उध्दवस्त होणार आहे. या कायद्यात किमान आधारभूत भावाची कुठलीही तरतूद नाही. शेतकऱ्याचे विकासाचे केंद्र असलेल्या मार्केट कमिटीया बरोबरच तेथे काम करणाऱ्या हजारो कामगारांचे संसार मोडीत निघणार असून शेतकरी व कामगारांचे संरक्षण हिरावून घेण्याचा प्रकार आहे
वेगवेगळे काळे कायदे निर्माण करून भाजपाच्या मोदी सरकार ने वंचीतंना न्याय देण्याऐवजी बहुमताच्या जोरावर अनेक घातक निर्णय घेतले आहे. हे निर्णय म्हणजे प्रगतीला आडकाठीच असा आरोप याप्रसंगी कामगार नेते नागेश सावंत यांनी केला. यावेळी यूनियनचे राज्य प्रतिनिधी राजेंद्र भोसले, जलील शहा, भरत जाधव, विष्णू भागवत, जनार्दन भवर, भारती शिंदे, सिंधूबाई बनकर, ज्योती राठोड. लता माळी कुसूमबाई पवार सचिन बीरसने.मनोज पवार.राहुल पंतगे.शेयाब शाह.भारत खंडागळे. बाबु शाह.कादर शाह.नंदु रोकडे. शफिक शेख.आरुण बडवे. मधुकर खंडागळे. तुकाराम खंडागळे. सुरज जाधव.राजेंद्र यादव.राहुल गायकवाड. बी एम पवार. इकबाल शाह.अन्सार शाह.बाबासाहेब त्रिभुवन. डी एस जाधव.बाबुराव सोनवणे. ताराचंद आलगुंडे.दत्तु म्हसे.सुखदेव गावडे.नंदा मोरे. भिमबाई बर्डे.लक्ष्मी माळी.यांच्या हस्ते दिल्ली मध्ये आंदोलन करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यावर अत्याचार करणाऱ्या मोदि भाजपा सरकारचे निषेध करणारे निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील यांना युनियनच्या वतीने देण्यात आले.
धत्रपती राजे संभाजी चौकात अचानकपणे नरेंद्र मोदी यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.मोदि यांच्या एका हातात गाजर तर दुसऱ्या हातात मुळा होता शेतकऱ्यांना गाजर दाखविले तर कामगारांना मुळा.हे पाहून आनेकांना खदखदुन हासु आले गाजर मुळा हा चर्चेचा विषय ठरला याप्रसंगी वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या. घोषणाने परिसर दणाणून सोडला होता.
आपला विश्वासू
राजेंद्र भोसले
(कामगार युनियन प्रांत सदस्य)

