अहमदनगर। प्रतिनिधी; दि. 16
रेखा जरे हत्याकांड प्रकरणात पत्रकार बाळ बोठे याचा जामीन अर्ज न्यायालयाने बुधवारी नामंजूर केला आहे.
रेखा जरे खून प्रकरणात मुख्य सुञदार म्हणून बाळ बोठे याचे नाव आले होते.सुरुवातीला रेखा जरेंची हत्या झाल्यानंतर सिव्हिल हाॅस्पिटल ते अंत्यविधीपर्य॔त बोटे जरे फॅमिलीचा पाठराखण करताना दिसला.त्यानंतर त्याचे नाव जरे यांच्या प्रकरणात आल्याचे दिसताच तो फरार झाला असून, बोठे याला जामीन मिळण्यासाठी न्यायालयात बोठे याच्या वकीलाने अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर आज दि.16 रोजी सुनावणी झाली, यावेळी बोठे याचा विषय गांभीर्याने घेत जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला.
यापूर्वीच या खून प्रकरणातील आरोपी फिरोज राजू शेख वय 26 रा. संक्रापूर आंबी ता. राहुरी, ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे वय 24 रा. कडीत फत्त्याबाद ता. श्रीरामपूर; आदित्य सुधाकर चोळके वय 25 रा. तिसगाव फाटा कोल्हार ता. राहता; सागर उत्तम भिंगारदिवे वय 31, रा. शास्त्रीनगर केडगाव अहमदनगर; ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार वय 23, रा. प्रवरानगर ता. राहाता; या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासात बाळ ज. बोठे याचे नाव आल्यापासून तो फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून पुढील तपास चालु आहे.

