shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निरा भिमा कारखान्याचे इथेनॉल ऑइल कंपन्यांकडे रवाना - हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते टॅंकरचे पूजन..!!

इंदापूर :प्रतिनिधी दि.२/१२/२०
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे इथेनॉल हे  ऑइल कंपन्यांकडे पाठविण्याचा शुभारंभ आज बुधवारी (दि.२) कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंञी हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते २ टँकरचे पूजन करून करण्यात आला.
          

याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, हरिदास घोगरे, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जामदार, प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील, अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
 
            
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, कारखान्याच्या आसवणी प्रकल्पातून आजअखेर इथेनॉलचे ८४२९२३ लि. व अल्कोहोलचे १७१९९६१ लि.चे उत्पादन घेतलेले  आहे. कारखान्याने आजपर्यंत उसाचे १,९१,८४० मेट्रिक टन एवढे चांगले गाळप पूर्ण केले आहे. तसेच सह-वीजनिर्मिती प्रकल्पामधून ८२२७६२१ युनिट वीजेची विक्री करण्यात आली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. 
  ___________________________
close