shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी सैनिक अनिल लगड यांनी केला एकलहरे ग्रामपंचायती साठी उमेदवाारी अर्ज दाखल...!!

  श्रीरामपूर [ प्रतिनिधी ] श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायतीचा वार्ड क्रमांक २ साठी माजी सैनिक अनिल लगड यांनी खुल्या वर्गातून उमेदवाारी अर्ज दाखल केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या विनंतीला मान देत माजी सैनिक श्री अनिल लगड यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी सहमती दर्शविली व ग्रामस्थांच्या सहकार्याने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. श्री लगड यांनी सैन्यदलात नोकरी करत देश सेवा केली आहे.

तसेच येथील ग्रामस्थांच्या विविध अडीअडचणी चे सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात तसेच अनेक तरुणांना त्यांनी देशसेवेसाठी प्रेरित करून सैन्य दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन केले आहे, व सध्या सैन्य दलातील निवृत्त सैनिक यांना मार्गदर्शन करत त्रिदल सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदावरून ते कार्य करत आहेत.

या सर्व कार्याची दखल घेत ग्रामस्थ तसेच माजी सैनिक पदाधिकारी एकलहरे येथील मित्रपरिवार ग्रामपातळीवरील रहिवाशी व मोठ्या संख्येने माजी सैनिकांच्या सहकार्याने तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी अर्ज सादर करताना एकलहरे येथील ग्रामस्थ पदाधिकारी तसेच त्रिदल सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष व उमेदवार माजी सैनिक श्री अनिल लगड, नगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष निवृत्त सुभेदार, के डी सरदार, उपाध्यक्ष संग्राम यादव, सचिव बद्रीनाथ देशमुख तसेच एकलहरे येथील मतदार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close