shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मांडले महालुंगे खु. ते काकलघर (मुरूड) रस्त्याचं कामकाज सुरू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सतेज ठाकुर यांचा जण आंदोलनाचा इशारा..!

मुरूड। प्रतिनिधी(विकास मेहेतर):
मुरूड तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत काकलघर महालुंगे तसेच मांडला ग्राम पंचायत या हद्दीमधील 7 गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अतिशय दयनीय परिस्थिती झाली असून या रस्त्यामध्ये 10 किलोमीटर परिसरात  जागो जागी खड्यांचं साम्राज्य पसरलं आहे,  जनतेला त्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः महिला वर्ग तसेच पायी चालत जाणारे जेष्ठ नागरिक आणि वाहन धारक यांना या रस्त्याने येता जाता खूप त्रास सहन करावा लागत असून नागरिकांना मणक्याच्या आजाराचे दुखणे सहन करावे लागत आहे 

सदरचा रस्ता हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ( संशोधन व विकास ) २०१८/२०१९ अंतर्गत मांडले महालुंगे खु. ते काकलघर रस्ता (MRL-01) तालुका मुरूड रक्कम रुपये २०९४४४१८/- कामाचे दिनांक ०७/०३/२०१९ रोजी मे.सुप्रभात इन्फ्राझोन प्रा.ली. ता.अलिबाग जी.रायगड याना कार्यारंभ आदेश देऊनही अद्याप ही कामाला सुरवात केलेली नाही.

सदरील रस्त्याची वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासन कोणतीच कारवाई करीत नसल्याकारणाने ग्रुप ग्राम पंचायत काकलघर महालुंगे येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेना गटप्रमुख सतेज सुभाष ठाकूर यांनी येत्या 30 दिवसांच्या आत रस्त्याच्या कामकाजाला सुरवात झाली नाही तर जण आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिनांक ९/१२/२०२० रोजी मा.कार्यकारी अभियंता अलिबाग रायगड यांना लेखी निवेदन देऊन केली आहे. 

यावेळी त्यांच्या सोबत मांडला ग्राम पंचायतिच्या सरपंच सुचित्रा सुरेश पालवनकर , उप सरपंच राजेश पाटील , माजी सरपंच शैलेश रातवडकर , माजी सरपंच साक्षी गायकवाड , सदस्य बशीर गोरमे , काकलघर ग्राम पंचायत सदस्य वैभव वादळ , महालुंगे गावचे अध्यक्ष गणेश ठाकूर , पारगाण ग्रामस्थ मंगेश कुळवे , मांडला काँग्रेस कमिटी अध्यक्ष अजगर दळवी , आणि सईद पंचुलकर इत्यादी होते.
close