सावळीविहीर(राजकुमार गडकरी) :
अहमदनगर जिल्ह्यातील आज शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत.
यामध्ये शिर्डीचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार नीळकंठ गोकावे यांचीही बदली झाली आहे. नितीन गोकावे हे वाहतूक शाखेत शिर्डी येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.मात्र त्यांची बदली आता सुपा पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.त्यांच्या जागेवर अहमदनगर नियंत्रण कक्षातून नारायण शंकर न्याहाळदे यांची पोलीस निरीक्षक म्हणुन शिर्डी वाहतूक शाखेला नेमणूक करण्यात आली आहे.
तर अहमदनगर येथील प्रभाकर भाऊराव पाटील यांचे नियंत्रण कक्षातून शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर सुपा येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बापूराव भोसले यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.या बदल्या दि.11/12/2020 रोजी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे, शिर्डीचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन गोकावे यांची सुपा पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे तर वाहतूक शाखेला आता पोलिस निरीक्षक नारायण शंकर न्याहळदे हे आले आहेत.या बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आजच्या बदलीच्या ठिकाणी हजर होऊन तसा अहवाल पोलीसथे द्यायचा आहे.असेही ही पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर अधीक्षक मनोज पाटील यांनी केलेल्या आदेश पत्रात म्हटले आहे.ञण

