सावळीविहिर (प्रतिनिधी):
शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मंदिरात तोकडे कपडे घालून जाऊ नये.संस्कृती प्रधानअश्या सभ्य वेशभूषा घालून मंदिरात शक्यतो यावे.असे आवाहन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी नुकतेच केले होते व तसे साई संस्थानने फलकही लावले होते व त्याचबरोबर त्यांनी संस्थांनचा साईभक्तांसाठी कोणताही ड्रेसकोड नाही.
मात्र हे एक आवाहान आहे.असे ही म्हटले होते.मात्र या विधानाचा व फलकांचा विपर्यास करुन भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने असे वक्तव्य करून फलक लावून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करीत असून आपण तेथे जाऊन फलक फाडून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले असल्यामुळे शिर्डीतील नागरिक व साईभक्तामधून तृप्ती देसाई यांच्या विरोधात तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे व तृप्ती देसाई यांनी संस्थानचे कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी नेमके यासंदर्भात काय वक्तव्य केले..!
याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे उगाच प्रसिद्धीसाठी स्टंट करून आंदोलन करण्याची भाषा शिर्डीत येऊन करण्याची ही थांबवली पाहिजे.असे आता शिर्डीतील नागरिक व साईभक्तामधून बोलले जात आहे, शिर्डीत श्री साईबाबांच्या मंदिर व परिसरात जाताना सभ्य, भारतीय संस्कृती प्रधान गणवेशात मंदिराच्या दर्शनाला परिसरात गेले तर मनाला समाधान वाटते.त्यामुळे शक्यतो असा सभ्य गणवेश असावा. तोकडे कपडे घालू नये. असे आवाहान संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी केले होते.
मात्र त्याच वेळी त्यांनी संस्थांनचा साईभक्तांसाठी कोणताही ड्रेसकोड नाही. भक्तांना फक्त एक विनंती पूर्वक।हे आवाहन त्यांनी केले होते.मात्र त्याचा विपर्यास करत भुमाता ब्रिगेड अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी असे वक्तव्य किंवा संस्थांनचे असे फलक हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे.असे म्हणत शिर्डीतील हे फलक काढावेत नाहीतर आपण शिर्डीत येऊन आंदोलन करू!असे जाहीर केले असल्याने यावर मोठा शिर्डीकर व साईभक्तांमध्ये गदारोळ उठला आहे.
तृप्ती देसाईयांच्या विरोधात शिर्डीकर व साईभक्त मोठ्या जोमाने उठले असून जर तृप्ती देसाई यांनी साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांचे पूर्ण वक्तव्य ऐकावे व मगच निर्णय घ्यावा व स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जर असे आंदोलन करत असाल तर शिर्डीत येऊन दाखवा व फलकही फाडून दाखवा.असे रोखठोक आवाहान त्यांना अहमदनगर उत्तर जिल्ह्याच्या शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्ष अनिताताई विजय जगताप यांनी दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, तृप्ती देसाई ह्या फक्त प्रसिद्धीसाठी असे आंदोलन करत असतात.त्यांनी आतापर्यंत असले आंदोलन प्रसिद्धीसाठी केलेले आहे.
मुळात त्यांना साई संस्थानने काय निर्णय घेतला किंवा संस्थांनच्या कार्यकारी अधिकारी बगाटे हे काय बोलले.हेच पूर्ण माहित नाही, असे असताना आंदोलनाची भाषा करणे योग्य नाही. जर आंदोलनच करणार असाल तर शिवसेना जशास तसे उत्तर देईल असे सडेतोड उत्तर शिवसेनेच्या उत्तर नगर जिल्हा महिला अध्यक्ष अनिताताई जगताप यांनी दिला आहे. तर शिवसेना तालुका महिला संघटक सौ स्वाती सुनिल परदेशी यांनीही ही तृप्ती देसाई यांनी आंदोलनासाठी शिर्डीत तर येऊन दाखवा! असे जाहीर आवाहन करत तृप्ती देसाईंना शिर्डीत तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
त्याच प्रमाणे शिर्डीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कमलाकर कोते यांनी या संदर्भात म्हटले आहे की, तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन हे फलक फाडू. पुजारी अर्धनग्न असतात. असे जी भाषा वापरली आहे. ती त्यांना शोभत नाही.शिर्डी हे श्री साई बाबांचे श्रद्धा सबुरी ची शिकवण देणारे पवित्र स्थळ आहे .येथे श्रद्धा सबुरी धरली पाहिजे. साईबाबा मंदिर हे पवित्र जपणारे स्थळ असून प्रत्येकाची मनाची पवित्रता राखून दर्शन व्हावे. यासाठी संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सभ्य गणवेशात साईभक्तांनी यावी असे आवाहन केले आहे. त्यांनी बळजबरी किंवा ड्रेस कोड साईभक्तांना लावलेला नाही.पण ते तृप्ती देसाई यांनी समजून न घेता थेट प्रसिद्धीसाठी आंदोलनाची भाषा केली.
त्यांनी असेच आंदोलन गोव्यात करावे अनेक मंदिरात आजही दर्शनाला जाताना शर्ट काढून जावे लागते किंवा गोव्यातही अनेक लोक उघडे तोकडे कपडे घालून फिरतात तेथे आंदोलन करावे. असा उलटप्रश्नही कमलाकर कोते यांनी केला आहे, त्याच प्रमाणे भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिन तांबे यांनीही ही तृप्ती देसाई यांनी हा राजकीय स्टंट करू नये, त्याला राजकीय स्वरूप किंवा रंग देऊ नये .श्री साईबाबांची नगरी ही पवित्र ठिकाण आहे, येथे देश विदेशातून साईभक्त येतात व येथे आल्यानंतर सभ्य गणवेशात मंदिरात जातात, संस्थांननी जो निर्णय घेतला आहे, तो योग्य आहे.शिर्डीकर म्हणुन या संस्थांनच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे, साईभक्तांचा त्यास पाठिंबा आहे.पण या निर्णयाला राजकीय स्टंट म्हणून कुणी पाहू नये ,विदेशातील साईभक्त येथे येत असतात मात्र ते सभ्य गणवेशातच घालून मंदिरात येत असतात, मात्र जे कोणी येथील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला म्हणत राजकीय स्टंट करू पाहत आहेत.ते चुकीच्या असून जर यापुढे नुसता प्रसिद्धीसाठी स्टंट करणे, शिर्डीकर व साईभक्त सहन करणार नाही.
असेही यावेळी आवाहान देत सचिन तांबे यांनी सांगितले आहे, एवढेच नव्हे तर शिर्डीतील अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी ,त्याप्रमाणे देश-विदेशातील साईभक्त यांनीही ही फोन करून व इतर सोशल माध्यमाद्वारे साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी जजो निर्णय घेतला आहे किंवा फलक लावले आहेत हे योग्यच आहे, त्याचे स्वागत आहे. असे म्हटले असून यास कोणीही विरोध केला तर त्याचाही निषेध अनेक साईभक्तांनी दर्शवला आहे, मात्र तृप्ती देसाई ने या साठी जी भाषा आंदोलनाची वापरली ती योग्य नसून तृप्ती देसाई ला शिर्डी व साई भक्तां मधून जशास तसे उत्तर देईल असेही सर्वसामान्य नागरिक ,साईभक्त, शिर्डीकर यांच्यामधून आता आवाहान देण्यात येत आहे.

