shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलीस ठाणे आरक्षण चा चेंडू देवळाली प्रवरा नगरपालिकेचे कोर्टात..!!

देवळाली प्रवरा ।  प्रतिनिधी :
देवळाली प्रवरा येथील पोलीस खात्याच्या जागेवर नगरपरिषदेने टाकलेले आरक्षण हटविणेसाठी मा. जिल्हा पोलिस अधिक्षक - अहमदनगर यांची आप्पासाहेब ढुस यांनी भेट देऊन आरक्षण हटविणेसाठी मागणी केली होती.  मागणी नुसार जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक - राहुरी यांनी  देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील पोलीस खात्याच्या मालकी हक्क जमिनीवर नगरपालिकेने बेकायदेशीर टाकलेले आरक्षण तातडीने रद्द करण्याकरता  पत्रव्यवहार केला आहे.


आरक्षण तात्काळ रद्द करण्याची पोलीस प्रशासनाची मागणी असून त्यामुळे देवळाली प्रवरा येथील पोलीस स्टेशन नवीन इमारतीचा मार्ग मोकळा होणार आहे. पोलीस खात्याच्या जागेवरील आरक्षण रद्द करण्यासाठी नगरपालिकेच्या कार्यवाहिकडे पोलीस प्रशासनाचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
close