shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उस उत्पादक शेतकऱ्यांचा तेलगाव कारखान्यावर मोर्चा..!ऊसाला २५०० टन भावासाठी केले धरणे आंदोलन..!!

बीड । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे:- 
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा साखर कारखान्याने गाळपासाठी नेलेल्या उसाला पहिला हप्ता 2500 रुपये प्रतिटन भाव द्यावा या मागणीसाठी मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. 

 **------ लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव यांनी पहिला हप्ता 1600 रुपयांनी काढुन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्याच्या निषेधार्थ या व इतर मागण्यांसाठी काल दि.21 डिसेंबर रोजी उस उत्पादक शेतकऱ्यांनी तेलगाव येथील छत्रपती शिवराय चौक ते लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्यावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले**.----- 


माजलगाव मतदारसंघात लोकनेते सुंदरराव सोळंके कारखाना, छत्रपती साखर कारखाना, जय महेश शुगर असे तिन कारखाने असुन यामध्ये यावर्षी गाळपासाठी नेलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याने 1600 रुपये प्रति टन पहिला हप्ता दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात पिळवणूक झाली आहे.

 
तर छत्रपती कारखाना 1900 रूपये व जय महेशने 2000 रुपये पहिला हप्ता दिला आहे. तरी लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याने कमी हप्ता काढलेला आहे.  त्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यां मध्ये तिव्र संतापाची भावना निर्माण झालेली आहे.  शेतकऱ्यांच्या उसाचा पहिला हप्ता 2500 रूपये प्रति टन द्यावा, एफ आर पी प्रमाणे उस दर आठ दिवसात जाहीर करावा, उस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना 265 जातीच्या उस लागवडीसाठी परवानगी द्यावी, शेतकऱ्यांना उसाचे बिल 15 दिवसात द्यावे, साखर उत्पन्ना शिवाय कारखान्याने जे काही विविध प्रकल्प सुरू केले आहेत त्याची माहिती संकेत स्थळावर प्रसिध्द करावी, सभासद शेतकऱ्यांचा उस प्राधान्याने नेण्यात यावा या मागण्यांसाठी उस उत्पादक शेतकरी,सभासद यांनी काल दि.21 डिसेंबर सोमवार रोजी  तेलगाव येथील छत्रपती शिवराय चौक पासून साखर कारखान्यावर भव्य मोर्चा काढून गेट समोर धरणे आंदोलन केले . यावेळी श्रीराम बादाडे यांनी साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल कळत नसून उस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या कार्यकारी संचालक मंडळाने मान्य कराव्यात नसता यापेक्षा तिव्र आंदोलन करण्यात येईल असे विचार बोलताना व्यक्त  केले . यावेळी लेखी मागण्यांंचे निवेदन  एम.डी.यांना  देण्यात आले . यावेळी वडवणी तालुक्यासह माजलगाव मतदारसंघातील उस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . यावेळी कसलाही अनुचित प्रकार घडु नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.    

माजलगाव भाजप नेते रमेश आडसकर यांनी अंबासाखरची यंत्रणा मोठ्या प्रमाणात  माजलगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लावली आहे. व चांगला भाव देण्याचें आश्वासन दिले आहे. हे विषेश.
close