shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अजित करळे यांच्या स्कोडा गाडी चे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पूजन करून स्वतः केली ड्रायव्हिंग..!!

इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर: इंदापूर येथे  माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते व राजवर्धन पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया उपाध्यक्ष व बावडा गावचे अजित विनायक करळे यांच्या नवीन स्कोडा गाडीचे पूजन भाग्यश्री बंगला येथे करण्यात आले .यावेळी स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी गाडीचे ड्रायव्हिंग करून गाडी चालवली .यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी अजित करळे यांना शुभेच्छा देऊन कौतुक केले .

अजित करळे हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ,हर्षवर्धन पाटील यांची कार्यकर्त्यांच्या बद्दलची आपुलकी व प्रेमाचे दर्शन पाहून आज धन्य वाटले ."आपल्या कार्यकर्त्यांची प्रगती हाच आपला आनंद". खांद्यावर हात टाकून अशीच प्रगती कर म्हणणारे हर्षवर्धन पाटील यांचा  आशीर्वाद प्रगतीच्या दिशेकडे घेऊन जाणारा असतो आणि त्यांच्या विचारधारेवर प्रगतीचा आलेख शेती व व्यवसायामध्ये प्रकट करून दाखवू असा विश्वास या आनंदा प्रसंगी व्यक्त केला. तसेच बावडा येथे चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या हस्ते गाडीचे पूजन करण्यात आले.यावेळी  सुजितदादा करळे, संदीप कपणे इत्यादी उपस्थित होते.
close