नगर:- प्रतिनिधी । शिवा म्हस्के :
नगर ते गुंडेगाव मार्गावर खड्ड्याचे जणू जाळे आहे. या रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
अहमदनगर ते गुंडेगाव हा मार्ग श्रीगोंदा तालुक्याला जोडणारा हा रस्ता आहे.दोन तालुक्यांना जोडणारा अंतर्गत रस्ता असल्याने वाहनांची दररोज रेलचेल असते. यांच रस्त्यावर नगर तालुक्यातील बाजारपेठ गावे आहे वाळकी, देऊळगाव सिद्धी, गुंडेगाव,राळेगण,बाबुडीॅ असे गावे येतात. या गावावरुन श्रीगोंदा तालुक्याला जाता येते या रस्त्याने वाहनांची जास्त वर्दळ असल्याने दररोज शेकडो वाहने या रस्त्यांने वाहतूक करतात.तसेच वाळकी येथे पियुष खाजगी साखर कारखाना ऊस वाहतुकीमुळे रस्त्याने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे,
तसेच या वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण झाली आहे, व या मार्गावर अपघात होताना दिसत आहेत, मागील काही महिन्यांपासून हा रस्ता खराब झाला आहे. परंतू, या रस्त्याचे दुरुस्तीचे काम होण्याची प्रतिक्षा प्रवाशी करत आहे. काम होत नसल्याने रस्त्यावरील खड्डेच खड्डे आणि खड्ड्यात रस्ता झाला आहे. अनेक दिवसांपासून या रस्त्याची दूरुस्तीसाठी अनेक लोकांनी विनंती केली होती परंतू, अद्यापही "रस्ता जैसे थे" अवस्थेत आहे. त्यामूळे वाहनधारकांना वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रस्त्याच्या लगत असणाऱ्या गावांतील नागरिकांसह वाहनधारक यांना अहमदनगर येथे रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या वाहनांना गरोदर स्त्रिया, नोकरदार वर्ग,आजारी वयोवृद्ध नागरिकांना या रस्त्याने प्रवास करणे मरणयातना सोसण्यासारखे झाले आहे, प्रवाशी जीव धोक्यात घेऊन प्रवास करत आहेत, त्यामुळे हा रस्ता कधी दूरूस्त होतो? यांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तसेच लोकप्रतिनिधी, पुढारी,नेते, याबाबत काय कारवाही करणार की फक्त तेरी भी चूप मेरी भी चुप अशीच अवस्था या रस्त्याबाबत नागरीकांना पाहायला मिळत आहे.व संबंधित कंत्राटदार काम करतांना बरेच वेळा असे दिसते की निकृष्ट कामे करतात लोकप्रतिनिधींना यातील काही टक्के वारी पोहच होत,असल्याने या विषयी ब्र शब्द कोणी काढत नाही, यातील मुलीदा वाटा वाटीत हा रस्त्याची वाट लागली आहे.
आपणास या रस्त्यावर कायमचं खड्डे पहायला मिळतील तसेच सदर कामे जरी ठेकेदाराला दिले असले तरी ही कामे धिम्या गतीने करताना दिसत असतात,त्यामुळे वाहानधारकांना अधिकच कसरत करावी लागत असते, असे या मार्गावरील जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी,सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आगळे, गुंडेगावचे उपसरपंच मंगेश बापू हराळ, भवानीप्रसाद चुंबळकर, भाऊसाहेब शिंदे, उद्योजक संतोष कोतकर,संजय भापकर, माऊली कुताळ, सचिन जाधव,दादा जावळे, व नागरिकांनी याबाबत भावना व्यक्त केली आहे, त्यामुळे नागरिकांतून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत.

