प्रतिनिधी। मोहन शेगर :
पुणे - शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक आणि मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद मराठे यांचा अखेर मृत्यू झाला आहे.
मिलिंद मराठे
मिलिंद मराठे यांनी १६ डिसेंबर रोजी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु आज पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
मिलिंद मराठे हे पुणे शहरातील नामांकित सराफा व्यावसायिक होते. मागील काही दिवसांपासून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.त्यातच लॉकडाऊन लागू झाल्यामुळे त्यांच्या नैराश्यात आणखी भर पडली. त्यातूनच त्यांनी १६ डिसेंबर रोजी लक्ष्मी रस्त्यावरील त्यांच्या मराठे ज्वेलर्स या दुकानातच सायंकाळच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. छातीत गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

