प्रतिनिधी। मोहन शेगर :
सोनई- सोनई आरोग्य केंद्रा द्वारे संयुक्त सक्रिय क्षयरूग्ण व कुष्ठरूग्ण यांच्या शोध मोहिम अभियानाला आज सोनईत आशा स्वयंसेविका व आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्या वतीने सुरवात झाली.1 डिसेंबर ते 30 डिंसेबर 2020 या कालावधीत सोनई आरोग्य केंद्रातील आशा सेविका व आरोग्य कर्मचारी सोनई प्राथामिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणारा भागात जावुन क्षयरोग व कुष्ठ रोगाचे रूग्णांची शोधमोहिम राबवणार आहेत.
या मोहिमेचा उद्देश म्हणजे ग्रामिण भागातील क्षयरोग व कुष्ठरोगाचे रूग्ण सापडुन होणारा प्रचार व प्रसार थांबवणे हा उद्देश असुन या करिता सोनई आरोग्य केंद्राच्या वतीने मोहिमेचे आयोजन शिवाजी चौक या ठिकाणी शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आले.
यावेळी सोनई गावचे सामाजिक कार्यकर्ते संदिप कुसळकर, नितीन दरंदले, पंचायत समिती सदस्य काका डफाळ , ग्रामविकास अधिकारी रामकिसन बटूळे, मंडळाधिकारी माने एन.व्ही विरकर,पर्यवेक्षक राजेंद्र पाटोळे मेजर रमेश जावळे,गटप्रवर्तक श्रीमती आर.एन कुलट मॅडम, आदी आरोग्य विभागातील कर्मचारी या अभियानाला उपस्थित होते.

