shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'आयसरसाठी भूषण देशपांडे याची निवड..!!"

राहुरी: राहुरी येथील भुषण महेश देशपांडे विज्ञान शाखेतील पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँन्ड रिसर्च (आयसर) येथे निवड झाली. आयसरसाठी निवड झालेला भुषण हा राहुरी तालुक्यातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. 

भूषण ने बारावी पर्यंत शिक्षण हे राहुरी एज्युकेशन सोसायटीच्या ल.रा.बिहाणी विदयामंदीर प्रशालेत घेतलं आहे. बारावीच्या परिक्षेत त्याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून गणित विषयात १०० पैकी १००गुण मिळवले. जेईई मेन्स परिक्षेत ९६.६५ टक्के सीईटी परिक्षेत ९८.२५ टक्के गुण मिळवले.साई इन्स्टिट्यूट चे संतोष गाढे सर यांच्या सह त्याला प्रशालेतील मुख्याध्यापक प्राध्यापक सर्व शिक्षक आई मनिषा वडील महेश देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
  
वडाळा महादेव येथील दिलीप नवले यांनी भुषणचे पुणे येथील आयसर शास्त्रज्ञ शाखा विभागात निवड झाली. त्याबद्दल अभिनंदन केले आहे.तसेच सर्व स्तरावर भुषण चे निवडीसाठी खुप शुभेच्छा देऊन कौतुक अभिनंदन केलं जात आहे.
close