इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने निवडणूक अधिकारी व कर्मचारी नेमणुकी संदर्भात इंदापूर तहसील कचेरी येथे विनंतीपूर्वक निवेदन सादर...!!
इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर: २९ डिसेंबर २०२०.काल(दि.२८) इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुक २०२१ साठी निवडणूक कर्मचारी म्हणून शिक्षक वर्गातील अपंग शिक्षक शिक्षिका,महिला शिक्षकां व ५५ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक आणि शिक्षिका यांना मतदान अधिकारी अथवा कर्मचारी म्हणून नेमणूक देण्यात येऊ नये .कारण सध्या थंडीचे दिवस असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसून गंभीर आजार असलेल्या शिक्षकांनी गंभीर आजार असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास गंभीर आजार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळावे अशा विनंतीचे पत्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या इंदापूर शाखेच्यावतीने इंदापूर तहसील कचेरी येथे या संदर्भात नायब तहसीलदार ठोंबरे यांच्याशी चर्चा करून
तहसील कार्यालय येथिल निवडणूक कामकाज प्रमुख अनगरे यांच्याकडे निवेदन इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल व सरचिटणीस सुनील मखरे यांच्या सहीने देण्यात आले.
यावेळी सुनील कोकाटे,सुनील मखरे,सुनील शिंदे, गणेश सोलनकर, शहाजी पोफळे ,शंकर कचरे आणि विनय मखरे हे शिक्षक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

