shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीच्या नगराध्यक्षपदी शिवाजी अमृतराव गोंदकर यांची बिनविरोध निवड..!!

सावळीविहीर (राजकुमार गडकरी) :
श्री साईबाबांच्या शिर्डी शहराच्या शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवाजी अमृतराव गोंदकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 शिर्डी हे एक आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असून येथील शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी तीन उमेदवार रिंगणात होते.सौ अनिताताई विजयराव जगताप ,शिवाजी अमृतराव गोंदकर व जगन्नाथ गोंदकर या तीन उमेदवारांचे अर्ज नगराध्यक्षपदासाठी येथे दाखल झाले होते. सात डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदाची निवड  आहे. मात्र तत्पूर्वीच दोन उमेदवारांनी आपले अर्ज आज माघारीच्या दिवशी मागे घेतले आहे. 

शिवसेनेचे अनिताताई विजय जगताप व जगन्नाथ गोंदकर यांनी आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी परत घेतल्यामुळे नगराध्यक्षपदासाठी एकच शिवाजी अमृतराव गोदंकर यांचा अर्ज राहिला आहे .त्यामुळे ते शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवडून आले आहेत .मात्र त्यांची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे हे सात डिसेंबर रोजी अधिकृतपणे तसे जाहीर करतील.मात्र आता शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवाजी अमृतराव गोंदकर हे बिनविरोध नगराध्यक्ष झाले आहेत. व त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

शिर्डीचे नगराध्यक्ष हे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेवर पदसिद्ध विश्वस्त असतात.त्यामुळे शिवाजी अमृतराव गोंदकर हे आता शिर्डी नगराध्यक्ष बरोबरच श्री साईबाबा संस्थानवर विश्वस्त म्हणूनही राहणार आहेत. तसेच ते स्थानिक रेल्वे सल्लागार समितीवर सदस्य आहेत.
close