सावळीविहीर (प्रतिनिधी):
आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीच्या श्री साईबाबांच्या दर्शनासाठी व सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनाने व्हावे म्हणून मोठ्या संख्येने साईभक्त विविध खाजगी व सार्वजनिक वाहनातून व पायी दिंड्यां मधून शिर्डीला दरवर्षी येत असतात.
शिवाय या कालावधीत नाताळ सण तसेच शैक्षणिक व शासकीय सुट्ट्या ही सलग आले आहेत.त्यामुळे यावर्षी साई भक्तांची गर्दी व वाहनांची गर्दी दिनांक 24 डिसेंबर 20 20 ते 4 जानेवारी 20 21 यादरम्यान शिर्डीत मोठ्याप्रमाणात होण्याचे लक्षात घेऊन शिर्डीत यादरम्यान साईभक्तांना त्रास होऊ नये म्हणून, तसेच साई मंदिर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. शिर्डी मध्ये गर्दी काळात वाहनांचे नियमन करता यावे,यासाठी शिर्डी शहरातील लक्ष्मी नगर टी पॉईंट ते नवीन पिंपळवाडी चौक यादरम्यान नगर-मनमाड रस्त्याच्या दोन्ही बाजूने दिनांक 24 डिसेंबर ते 4 जानेवारी रात्री 23 वाजेपर्यंत नो व्हेईकल झोन घोषित करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शिर्डीतील लक्ष्मी नगर टी पॉईंट ते नवीन पिंपळवाडी चौक यादरम्यान हा विना वाहन परिक्षेत्र( नो व्हेईकल झोन) नुकताच एका परिपत्रकाद्वारे जाहीर केला आहे व तसे आदेश पारित केले आहे. दिनांक 24 डिसेंबर 20 20 रोजी च्या पहाटे18 वाजेपासून तर 4 जानेवारी 20 21 पर्यंतच्या 23 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
या कालावधीत लक्ष्मीनगर टी पॉईंट ते नवीन पिंपळवाडी रोड चौक या दरम्यान शिर्डी शहरांमध्ये नगर-मनमाड रस्त्यावर नो वाहन झोन राहणार आहे, तरी सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी.अन्यथा नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असेही जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे. तसे आदेशही जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पटील यांनी पारित केले आहे.

