महेश देशमुख (टेंभुर्णी प्रतिनिधी) :
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी शहर-ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी दैनिक पुण्यनगरीचे पञकार धनंजय मोरे, उपाध्यक्षपदी दै.दिव्य मराठीचे पत्रकार गणेश पोळ,सचिव पदी दै.सकाळचे पत्रकार सुहास कांबळे,खजिनदार पदी दै.जनसत्य चे पत्रकार गणेश स्वामी यांची एकमताने निवड करण्यात आली.टेभुर्णी शहर-ग्रामीणपत्रकार संघाची बैठक रविवारी संध्याकाळी भिमानगर ता.माढा येथे पार पडली.
यावेळी टेंभुर्णी,बेंबळे,परीते,कन्हेरगाव पिंपळनेर व निमगाव या गावातील पञकारांनी एकञीत येऊन टेंभुर्णी शहर-ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केलेली आहे. या संघाची बैठक मावळते अध्यक्ष संतोष वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी टेंभुर्णी ग्रामीण पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्ष पदाची सुचना जेष्ठ पत्रकार सय्यदअली जकाते यांनी सुचना मांडली.या सुचनेला शिर्डी एक्सप्रेसचे पत्रकार महेश देशमुख यांनी अनुमोदन दिले.
यावेळी जेष्ठ पत्रकार मुकुंद रामदासी,सय्यदअली जकाते, संतोष वाघमारे, धनंजय मोरे, विनायक जोशी , प्रदिप पाटील, गणेश पोळ, गणेश स्वामी, रोहिदास साळुंखे , सिध्देश्वर शिंदे, सज्जन शिंदे , महेश देशमुख, राजेंद्र केदार, अभयसिंह भोसले, सचिन जगताप, सुहास कांबळे आदी सर्व दैनिकांचे पत्रकार उपस्थित होते.

