हिंगोली। प्रतिनीधी
दि२१,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील सुकळी(बु) येथील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते विठ्ठल रामचंद्र धाकतोडे यांची हिंगोली भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव पदी निवड झाल्याचे नियुक्तपत्र भाजप युवा मोर्चा हिंगोली जिल्हाध्यक्ष गणेश बांगर यांनी देऊन सत्कार केला आहे.
हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात युवा जिल्हाध्यक्ष नगरसेवक गणेश बांगर यांनी विठ्ठल धाकतोडे यांना नियुक्तीपत्र दिले.यावेळी हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर,महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारणी सदस्य अँड.के.के.शिंदे,नारायण खेडेकर,शंकरराव बोरुडे, गजानन देशमुख,ओम कोटकर-पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

