shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यशवंतनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयवंतराव माने- देशमुख यांचा वडापुरी येथे सत्कार ..!!

  यशवंतनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयवंतराव माने- देशमुख यांचा वडापुरी येथे सत्कार ..!!

इंदापूर प्रतिनिधी :तात्याराम पवार

वडापुरी: ३० डिसेंबर २०२०. वडापुरी येथे यशवंतनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयवंतराव यशवंतराव माने- देशमुख यांनी वडापुरी येथे संत माणकोजी बोधले महाराज  परिवार वडापुरी  येथे भेट दिली. 
यावेळी वडापुरी येथील बोधले परिवाराच्यावतीने जयवंतराव यशवंतराव माने- देशमुख यांचा   यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल (दि.२८) रोजी हार, र्श्रीफळ व फेटा घालून सत्कार करण्यात आला. जयवंतराव माने देशमुख हे अकलूज येथील मोहिते पाटील परिवारांचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे.
तसेच यावेळी उपस्थित शिर्डी एक्सप्रेस चे इंदापूर प्रतिनिधी तात्याराम पवार यांचा माने- देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी यशवंतराव माने- देशमुख  हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, संत माणकोजी बोधले महाराज यांच्या पावन भूमीतील बोधले परिवाराचा आमचा संबंध आणि अध्यात्मिक विचार दृढ व्हावेत तसेच इथून पुढच्या पिढीने दिवसेंदिवस अध्यात्मिक जीवनातून त्यांनी यशस्वी प्रगती करावी  ही  ऊर्जा बोधले महाराज यांच्या विचारातून घडते आणि ती घडत रहावी. अशा शब्दात त्यांनी मत व्यक्त केले
यावेळी भाजप इंदापूर तालुका संघटक सरचिटणीस महेश बोधले,   योगेश पवार, लक्ष्मण पवार व बोधले महाराज परिवार यावेळी उपस्थित होते.
close