shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २१८९ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!!

हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१८,हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण २१८९ रक्तदात्यांनी रक्तदान करून खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
  

        
राज्यातील कोरोनाची सद्य परिस्थिती आणि राज्यात मागील बऱ्याच दिवसापासून रक्ताचा तुटवडा  लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी  जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद  देत खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्हयातील हिंगोली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्रात रक्तदान आणि एकंदरीत सामाजिक उपक्रम आयोजित करावेत असे आवाहन केले होते.  


त्यानुसार खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिंगोली,कळमनुरी,वसमत,कुरुंदा,उमरखेड,हिंगोलीमध्ये उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे यांनी घेतलेल्या शिबिराला शिवसैनिकांनी प्रतिसाद देत २७० बॉटल रक्त जमा झाले, तर कळमनुरी मध्ये शिवसेना  आणि युवासेना जिल्हाध्यक्ष बाजीराव सवंडकर यांनी संयुक्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २८० जणांनी सहभाग नोंदविला.


वसमत मध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक सोपान नेव्हल पाटील ,सीताराम म्यानेवार,अक्षय भोसले  यांच्या नेतृत्वाखाली आयोजित रक्तदान शिबिरात सर्वाधिक ६७३ रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली.वसमत पाठोपाठ कुरुंदा येथे मन्मथ सिद्धेवार यांच्या निवासस्थानी कृउबा सभापती राजेश इंगोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित शिबिरात तब्बल २५१ जणांनी रक्तदान करून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.यवतमाळ जिल्हयातील उमरखेड येथे शिवसेना,युवासेना, आणि महिला आघाडी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात एकूण १९७ रक्तदान केले.
  
नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित केले होते नांदेड मध्ये जिल्हाप्रमुख आनंद  बोंढारकर,उद्धव पाटील शिंदे यांच्या वतीने आयोजित शिबिरात २५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर युवासेनेच्या वतीने  राजेश जाधव आणि मित्रमंडळाच्या वतीने आयोजित शिबिरात २६६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. या सर्व शिबिरात एकूण २१८९ बॉटल रक्त जमा झाले .यामुळे हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा  कमी होण्यास नक्कीच मदत झाली आहे.
close